शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधील रिक्षाचालकांना आरटीओची कारणे दाखवा नोटीस, २० दिवसांपासून रिक्षा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:22 IST

खारघर शहरात गेल्या २० दिवसांपासून तळोजा व खारघर येथील संघटनेच्या वादामुळे एकता रिक्षा संघटनेने आपल्या रिक्षा बंद ठेवल्या आहेत.

पनवेल : खारघर शहरात गेल्या २० दिवसांपासून तळोजा व खारघर येथील संघटनेच्या वादामुळे एकता रिक्षा संघटनेने आपल्या रिक्षा बंद ठेवल्या आहेत. या प्रकरणात प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी ७२ रिक्षा चालकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. परवाने का रद्द करू नयेत? असा प्रश्न या नोटीसमध्ये रिक्षा चालकांना विचारण्यात आला आहे.खारघर शहरात एकता रिक्षा संघटनेच्या माध्यमातून १६ वर्षांपासून शेकडो रिक्षा चालक याठिकाणी व्यवसाय करीत आहेत. या संघटनेचे ८०० पेक्षा जास्त रिक्षाचालक शहरात व्यवसाय करीत आहेत . मात्र, अचानक तळोजा येथील रिक्षा संघटनेने शहरातील विविध रिक्षा थांब्यांवर ताबा मिळविला असल्याचा आरोप एकता रिक्षा संघटनेने केला आहे. याच कारणावरून दोन्ही संघटनेच्या पदाधिकाºयांमध्ये हाणामारी झाली होती.या प्रकरणानंतर एकता रिक्षा संघटनेने आपल्या रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आमच्यावर उपासमारीची वेळ येत असल्याने तळोजा येथील रिक्षाचालकांना आवरा, अशी या रिक्षाचालकांची मागणी आहे. या प्रकरणात प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक पोलीस आयुक्त, आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील बैठक घेतली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तोडगा निघाला नाही. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी शुक्रवारी खारघरमधील रिक्षा चालकांना नोटिसा बजावल्या आहेत.