शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अवकाळीच्या फटक्याने रानमेवा संकटात : आवक घटल्याने आदिवासींच्या रोजगारावरही गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 20:00 IST

मधुकर ठाकूर उरण : उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि विविध औषधी गुणधर्म असणारा रानमेवा मात्र अवकाळी पावसामुळे संकटात सापडला ...

मधुकर ठाकूरउरण : उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि विविध औषधी गुणधर्म असणारा रानमेवा मात्र अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे. अवकाळीच्या फटक्याने रानमेव्याच्या बहरण्यावरच विपरित परिणाम झाला असल्याने यावर्षी बाजारपेठेत फारशा प्रमाणात दाखल झालाच नसल्याने दिसून येत आहे.त्यामुळे आबालवृद्धांसह सर्वांनाच प्रतिक्षा असलेल्या या मधूर रानमेव्याची चव या वर्षी मिळणे कठीण झाले आहे.

 उन्हाळ्याच्या सुरुवात होताच जंगलात नैसर्गिकरीत्या तयार झालेला  रानमेवा बाजारात येतो.यामध्ये करवंदे, कैरी , अंजीर ,काजू, चिंच, जांभळे, रांजणं आदींचा समावेश असतो. काळीमैना नावाने सर्वांना परिचित असलेली काळीभोर रसाळ करवंद आदिवासी साग‌‌‌ अथवा पळसाच्या पानांच्या द्रोणातुन तर ठीक ठिकाणी वाट्यावरही विक्री करताना दिसतात. जंगलातील जाळीदार काटेरी झाडे झुडपात आढळून येणारी हिरवीगार करवंदाचा उपयोग सीझनमध्ये स्वयंपाक घरात चटणी, ठेचा म्हणून दैनंदिन जीवनातही होत असतो.

खायला रुचकर असणाऱ्या  कैरी , अंजीर ,काजू, चिंच, जांभळे, रांजणं आदी प्रकारच्या रानमेव्यांची सीझनमध्ये सर्वानाच ओढ असते. या रानमेवामुळे आदिवासींना  काही प्रमाणात रोजगारही मिळत असतो. मात्र वारंवार कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे मात्र जंगलात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रानमेव्यावर गंडांतर आले आहे.अवकाळी पावसामुळे रानमेवा संकटात सापडला आहे.विपरित परिणाम झाल्याने बाजारात दाखल होणाऱ्या रानमेव्याची आवक घटली आहे.त्यामुळे आदिवासींचा रोजगारही बुडाला असल्याची माहिती सीताबाई कातकरी यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण