शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात राजीव गोरे यांची एकाकी झुंज यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:40 IST

अश्विनी बिद्रे हत्याकांडात आरोपींनी हा खटला कमकुवत करण्यासाठी अनेक प्रकारची शक्कल लढवली.

वैभव गायकर

पनवेल- अश्विनी बिद्रे हत्याकांडात आरोपींनी हा खटला कमकुवत करण्यासाठी अनेक प्रकारची शक्कल लढवली. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत या हत्याकांडाला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न केले, मात्र अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी याप्रकरणी जिद्दीला पेटून याप्रकरणी एकाकी झुंज दिली. याप्रकरणी नवी मुंबई पोलीसांनी काहीच दखल घेतली नाही म्हणून पती राजू गोरे यांनी उच्च न्यायालयात 4 ऑक्टोबर 2016 रोजी  याचिका दाखल केली.27 ऑक्टोबर 2016 रोजी  न्या. ए एस ओक आणि ए ए सय्यद  यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना डिसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली टीम नियुक्त करून तत्काळ अहवाल दाखल करण्याचा आदेश दिला. 31 जानेवारी 2017 ला खून करण्याच्या उद्देशून अपहरण करणे आदी बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर वर कंळबोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा  दाखल.याच दरम्यान तपास अधिकारी संगिता शिंदे-अल्फान्सो याची बदली झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर फेब्रुवारी 2017 पासून ऑक्टोबर 2017 पर्यंत नोकरीवरून कुरुंदकर गायब झाला.

या घटनाक्रमाची माहिती राजीव गोरे सतत समाज माध्यमांना देत असल्याने पोलिसांवर दबाव वाढल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यानी 17 नोव्हेंबर 2017 ला सोशल मीडियावर पोष्ट करून आलेल्या बातम्या खोट्या आहेत असे जाहीर केलं.या प्रकरणात हेमंत नगराळे हे आरोपीला मदत करत असल्याचा आरोप गोरे यांनी केला होता.यानंतर 7 डिसेंबर 2017 ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर  ला संध्याकाळी अटक झाली.16 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती , आणि मुख्य न्यायमूर्ती भारत सरकार यांना निवेदन करून राजू गोरे आणि 9 वर्षाची मुलगी सिध्दी यांनी न्याय मिळत नसल्यामुळेच ईच्छा मरणाची परवानगी मागितली. याची दखल राष्ट्रपतींनी घेत 25 जानेवारी 2018 ला चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य यांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले. न्या. राजेश अस्मर सत्र न्यायाधीश 1 याच्याकडून न्याय मिळणार नाही त्याच्याकडून खटला अन्य कोर्टात चालवावा म्हणून 7 जानेवारी 2020 ला चीफ जस्टीस ऑफ इंडिया नवी दिल्ली याच्याकडे राजीव गोरे यांनी  तक्रार केली.

15 जुलै 2016 पासुन आजतागायत याप्रकरणी सतत विषयाचा पाठपुरावा केला.कोल्हापुर ते पनवेल असा प्रवास अनेकवेळा न्यायालयीन प्रक्रियेसाठी केला.मुख्य आरोपी कुरुंदकर याने अनेकवेळा प्रकरणाला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न केला.मात्र विशेष सरकारी वकील,तपास अधिकारी तसेच मिडीयाने प्रकरणाला वेळोवेळी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे.- राजीव गोरे (अश्विनी बिद्रे यांचे पती )