शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांच्या इनोव्हाचा नंबर बोगस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 01:08 IST

वाहनांच्या नंबरचा हा घोळ नेमका कसा झाला ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इनोव्हा कारचा नंबर बनावट असल्याची बाब उघडकीस आली आहे. सदर नंबर हा खारघर येथील एका व्यक्तीच्या फॉर्च्युनर कारचा आहे. वाहनांच्या नंबरचा हा घोळ नेमका कसा झाला ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकविरा देवीच्या दर्शनानंतर मुंबईला जात असताना त्यांच्या ताफ्यातील इनोव्हा कारचा सानपाडा येथे किरकोळ अपघात झाला. त्या कारमध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे बसलेल्या होत्या. त्या इनोव्हा कारचा नंबर एम.एच. ०४ ए.आर. ९ असा होता. प्रत्यक्षात मात्र त्या नंबरची नोंदणी फॉर्च्युनर कारवर झालेली असून ती कार खारघर येथील विजय कळंबे यांची आहे. तर सध्या ती कार महाबळेशवर येथे असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे सदर नंबर हा फॉर्च्युनर वर नोंदवलेला असताना तो राज ठाकरे यांच्या इनोव्हा कारवर कसा असा प्रश्न निर्माण होत आहे.

राज ठाकरे यांच्या इतरही कारचे क्रमांक ९ असल्याने त्यांनी तो ठाणे आरटीओ कार्यालयातून मिळवला असावा अशीही शक्यता आहे. त्यामुळे या आरटीओच्या घोळामुळे हा प्रकार घडला का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याबाबत ठाणे आरटीओ अधिकारी रवी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही. परंतु अती महत्वाच्या व्यक्तींच्या वाहन नोंदणी बाबत घडलेला हा प्रकार समोर आल्याने महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत देखील प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे