शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

दरवाढीपूर्वीच रेल्वे ‘पास’

By admin | Updated: June 26, 2014 02:30 IST

25 जूनपासून लोकल पासात दुप्पट अशी वाढ होणार असल्याच्या भीतीपोटी त्यापूर्वीच पास काढून मोकळे झालेल्या प्रवाशांनी रेल्वेला रेकॉर्ड ब्रेक कमाई करून दिली आहे.

मुंबई : 25 जूनपासून लोकल पासात दुप्पट अशी वाढ होणार असल्याच्या भीतीपोटी त्यापूर्वीच पास काढून मोकळे झालेल्या प्रवाशांनी रेल्वेला रेकॉर्ड ब्रेक कमाई करून दिली आहे. 24 जून हा पास घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक प्रवाशांनी 
पास काढण्यासाठी लांबच लांब 
रांगा लावल्या. त्यामुळे याच दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेला मिळून 40 कोटी 71 लाख 99 हजार 200 रुपयांची कमाई करता आली. तर मागील चार दिवसांतच या दोन्ही रेल्वेने मिळून 70 कोटींची कमाई केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दरवाढीपूर्वी रेल्वे ‘पास’ झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. 
रेल्वे मंत्रलयाकडून प्रवासी भाडय़ात 100 टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे लोकलच्या पासात दुप्पट वाढ झाली. तर तिकीट दरात फक्त पाच रुपये एवढी अल्पवाढ होती. मात्र पासांत झालेल्या भरमसाट वाढीमुळे प्रवाशांचा खिसा कापला जाणार होता. 25 जूनपासून नवीन दरवाढ होणार असल्याने आणि या दरवाढीमुळे खिसा कापला जाणार असल्याने अनेकांनी 25 जूनपूर्वी पास काढण्यासाठी तोबा गर्दी केली. 
21 जूनपासून पश्चिम आणि मध्य 
रेल्वे मार्गावरील स्थानकांवर पास काढण्यासाठी गर्दी होऊ लागली. या दिवशी एक परिपत्रक काढून जुना आणि नवीन दरवाढीच्या पासातील फरक वसूल करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र याला खुद्द प्रवाशांनीच विरोध केल्यानंतर हे परिपत्रक मागे घेऊन असा कुठलाही फरक वसूल न करता 25 जूनपासून नवीन दरवाढ केली जाईल आणि तत्पूर्वी जुन्याच दराने पास वसूल केले जातील, असे रेल्वेने स्पष्ट केले. 
यानंतर 22 जूनपासून या दोन्ही रेल्वे मार्गावरील स्थानकांवर पास काढण्यासाठी गर्दी वाढू लागली. 24 जून रोजी तर ही गर्दी एवढी वाढली की अनेक स्थानकांवर पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. (प्रतिनिधी)
 
पासांचे दर दुप्पट होणार असल्याच्या भीतीपोटी प्रवाशांनी पास काढण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे रेल्वेने यातून कमाई करण्यास सुरुवात केली. 
पश्चिम रेल्वेला 21 जूनला पास विक्रीतून 2 कोटी 20 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. हेच उत्पन्न 24 जून रोजी वाढून 22 कोटी रुपये एवढे झाले. 
तर मध्य रेल्वेनेही 21 जून रोजी 1 कोटी 62 लाख रुपयांची कमाई केली. हीच कमाई 24 जून रोजी 18 कोटी 71 लाख रुपयांवर जाऊन पोहोचली. 
या दोन्ही रेल्वेने 21 जून ते 24 जून या चार दिवसांत एकूण 70 कोटी 32 लाख 26 हजार 720 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
 
पश्चिम रेल्वेवरील एकूण पासची विक्री (उत्पन्न रुपयांत)
तारीखमासिक त्रैमासिकसहामाहीवार्षिकउत्पन्न
21 जून288199527163614342 कोटी 20 लाख
22 जून1792310342296430322 कोटी 80 लाख
23 जून3417328863149231895713 कोटी 
24 जून2983949514347893695122 कोटी
 
मध्य रेल्वेवरील पासची विक्री (उत्पन्न रुपयांत)
तारीख          मासिक         त्रैमासिक         सहामाही         वार्षिक
पास   उत्पन्नपास  उत्पन्नपास   उत्पन्नपास   उत्पन्न
21 जून37,33377904657369526266088012588655551969515
22 जून206054364360969871699702346363818013814656820
23 जून510081116687028809200718501127816365355936932312610
24 जून4694011274690569174473393530275476226602351383567915