शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

पाचशे-हजाराच्या नोटा घेण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांचा नकार

By admin | Updated: November 17, 2016 05:18 IST

जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश असतानाही नालासोपारा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटां न घेता मग्रुरी केला जात आहे.

शशी करपे

वसई :  जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश असतानाही नालासोपारा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटां न घेता मग्रुरी केला जात आहे. शासनाने आदेश दिला ना मग शासनाकडून सुट्टे घेवून असे उद्धट उत्तर कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे अनेक बँकांनी फक्त खातेदारांनाच प्रवेश देऊन खाते नसलेल्यांना जुन्या नोटा बदलून देण्यास नकार द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वसईकर संतापले आहेत. पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा रेल्वेत स्वीकारण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे शेकडो प्रवाशांनी तिकीट आणि स्मार्टकार्ड रिचार्जंसाठी पाचशे रुपयांच्या नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न रेल्वेच कर्मचाऱ्यांनी हाणून पाडतानाच त्यांना खडे बोलही सुनावण्यास सुरुवात केली आहे. पाचशे रुपयांची नोट देवून शंभर रुपयांचा स्मार्टकार्ड रिचार्ज करण्याची मागणी केल्यावर ती नोट न घेता सुट्टे घेवून या. असे नालासोपाऱ्यातील तिकीट क्लार्ककडून सुनावली जात असल्याच्या तक्रारी आहेत.त्यामुळे अनेक प्रवाशांनी सुटे पैसे नसल्यामुळे विना तिकीट प्रवास करण्याचे धाडस केले आहे. नालासोपारातील रेल्वेचे कर्मचाऱ्यांमुळे आम्हाला विना तिकीट प्रवास करावा लागत असल्याचेही काही प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे होणाऱ्या रेल्वेच्या नुकसानीला जबाबदार धरून या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात येत आहे. वसई पूर्वेतील काही खासगी बँकांनी आजपासून केवळ बँक खातेदारांनाच जुने चलन बदलण्याची मुभा उपलब्ध करुन दिल्याने संतापाचा पारा चढला होता. विशेष म्हणजे पाचशे रुपयांचे चलन अद्याप बँकांपर्यत उपलब्ध झालेले नसल्याने दोन हजारांच्या नोटांचे बँकांकडून वितरण सुरु आहे. काही बँकांचे एटीएम वगळल्यास बहुतांश एटीएममधून अद्यापही पैसे काढता येत नसल्याने नागरीकांची बँकांबाहेरची झुंबड ओसरण्याचे नाव घेत नाही. अशावेळी वसई पूर्वेतील काही बँकांनी दुपारनंतर केवळ बँक खातेदारानांच बँकेत प्रवेश देण्यास सुरुवात केल्याने तासनतास रांगेत उभ्या राहिलेल्या नागरीकांची प्रचंड गैरसोय झाली. परिणामी बँक कर्मचारी व नागरीकांमध्ये काही ठिकाणी शाब्दीक बाचाबाची होताना दिसली. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सर्वच बँकांनी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे. परंतु वसई पूर्वेतील काही बँकांनी केवळ खातेदारांनाच प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याने नागरीकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वसई फाटा येथून आज काही जण जुन्या नोटा बदलण्यासाठी चालत वसई पूर्वेत आले होते. सकाळपासून रांगेत उभे राहिल्यानंतर या नागरीकांना नोटा बदलून मिळणार नाही, असे बँकेकडून सांगण्यात आल्याने त्या नागरीकांना अन्य बँकेत जाऊन पुन्हा रांगेत उन्हातान्हात तिष्ठत उभे राहावे लागले.