शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

रेल्वे अपघातात २४७ प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:19 IST

ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर गोवंडीपर्यंत वर्षभरात घडलेल्या अपघातांमध्ये २४७ प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर गोवंडीपर्यंत वर्षभरात घडलेल्या अपघातांमध्ये २४७ प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू रेल्वेरूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात झाले असून, त्यामध्ये गोवंडी ते मानखुर्द दरम्यानच्या ठिकाणांचा समावेश आहे. रेल्वेरुळ ओलांडण्यावर प्रतिबंध असतानाही शॉर्टकटच्या प्रयत्नात प्रवाशांकडून जीव मुठीत धरून रूळ ओलांडले जात आहेत.नवी मुंबईत ट्रान्स हार्बर तसेच हार्बर रेल्वेमार्गाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून अधांतरीच आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकाऱ्यांची उदासिनताही दिसून येत आहे. परिणामी, जागोजागी रेल्वेरूळ ओलांडण्याचे शॉर्टकट तयार झाले आहेत. स्थानकाचा प्रवेशद्वारमार्ग न वापरता थेट फलाटावर ये-जा करण्यासाठी अथवा रुळाच्या एका बाजूने दुसºया बाजूला जाण्यासाठी जीव धोक्यात घातला जात आहे. अशा ठिकाणावरून रेल्वेप्रवाशांकडून दिवसरात्र रूळ ओलांडले जात आहेत. अशा वेळी वेगवान रेल्वेची धडक लागून प्रवासी मृत्यू पावण्याचे अथवा जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यानुसार सन २०१९ मध्ये वाशी व पनवेल रेल्वे पोलिसांच्या हद्दीत एकूण २४७ रेल्वेप्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यापैकी ७८ प्राणांतिक अपघात पनवेल रेल्वेपोलिसांच्या हद्दीत बेलापूर ते पनवेल व पनवेल ते कळंबोली दरम्यान घडले आहेत. तर उर्वरित १६९ मृत्यू हार्बर मार्गावर वाशी रेल्वेपोलिसांच्या हद्दीत सीवूड ते गोवंडी व वाशी ते ऐरोली दरम्यानचे आहेत. त्यामध्ये बहुतांश अपघात मानखुर्द ते गोवंडी दरम्यान रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांसोबत घडलेले आहेत.रेल्वेप्रवाशांकडून रूळ ओलांडला जाऊ नये, याकरिता त्यांच्यात जनजागृतीच्या उद्देशाने रेल्वेपोलिसांकडून अनेकदा जनजागृती केली जाते. यानंतरही घाईमध्ये रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात थेट फलाटावर जाण्यासाठी रेल्वेप्रवाशांकडून शॉर्टकट वापरला जातो. अशा वेळी वेगवान रेल्वेची धडक बसून त्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. तर त्यातून बचावलेल्यांपैकी काहींना शरीराचा एखादा अवयव निकामी झाल्याने कायमचे अपंगत्व पत्करावे लागत आहे. वाशी व पनवेल रेल्वेपोलीस ठाणेच्या हद्दीत दोन वर्षांत ४९८ जणांना रेल्वेअपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेअपघातामध्ये जखमी होणाºयांचीही संख्या अधिक आहे. वाशी रेल्वेपोलिसांच्या हद्दीत २०१९ मध्ये १५५ प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वेअपघातांमध्ये जखमींची ही संख्या २०१८ च्या तुलनेत गतवर्षी २६ ने अधिक आहे. रेल्वेअपघातामध्ये मृत पावलेल्यांमध्ये रूळ ओलांडणाºयांपाठोपाठ रेल्वेतून पडून मृत पावणाºयांचीही संख्या दखलपात्र आहे. गर्दीच्या वेळी दरवाजात उभे राहिल्याने अथवा स्टंटबाजी करण्यासाठी दरवाजाला लटकल्याने पडून त्यांच्यासोबत अपघात झाले आहेत. त्यानुसार वाशी रेल्वेपोलिसांच्या हद्दीत २०१९ मध्ये ६४ जणांचा तर २०१८ मध्ये ७५ जणांचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला आहे. सातत्याने असे अपघात घडत असतानाही रेल्वेच्या दरवाजात लटकणाºयांना आवर घालण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.>संरक्षण भितींनाही भगदाडप्रवाशांकडून रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात होणाºया अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वेमार्गाभोवती तारेचे कुंपण अथवा भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी तशी भिंत उभारण्यातही आलेली; परंतु प्रवाशांकडून पुन्हा अशा ठिकाणी भगदाड पाडून शॉर्टकट तयार केले जात आहेत. सद्यस्थितीला बहुतांश रेल्वे स्थानकालगत तसेच लोकवस्तीच्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असे शॉर्टकट पाहायला मिळत आहेत.>रेल्वे प्रवाशांकडून जीव धोक्यात घालून रूळ ओलांडले जात आहेत. त्यानुसार गतवर्षात वाशी रेल्वेपोलीस ठाण्याच्या हद्दीत ७७ प्रवाशांना रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात प्राण गमवावे लागले आहेत. तर ६४ प्रवासी रेल्वेतून पडल्याने मृत पावले आहेत. रेल्वे रूळ ओलांडू नये याबाबत जनजागृती करूनही घाईमध्ये मारलेला शॉर्टकट त्यांच्या जीवावर बेतत आहे.- नंदकिशोर सस्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे