शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांना साकडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 03:08 IST

पनवेलसह रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या रेल्वेविषयक मूलभूत सुविधा सोडवाव्यात, या मागणीसाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिले.

पनवेल : पनवेलसह रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या रेल्वेविषयक मूलभूत सुविधा सोडवाव्यात, या मागणीसाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिले.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, सतीश धारप, माजी आमदार देवेंद्र साटम, विष्णू पाटील, अ‍ॅड. महेश मोहिते, गंगाधर पाटील आदीसह भाजपाच्या जिल्हा पदाधिकाºयांचा समावेश होता. कोकण रेल्वेच्या दक्षिणेकडे जाणाºया लांबपल्ल्याच्या गाड्या पेण व रोहा रेल्वेस्थानकांमध्ये थांबाव्यात. तेथे या सर्व गाड्यांना आरक्षण कोटासुद्धा उपलब्ध व्हावा, दिवा-रोहा रेल्वेला १२ डब्यांऐवजी १५ डबे असावेत. दिवा-रोहा रेल्वेची १ फेरी वाढवावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. पेण रेल्वेस्थानकातून रिटर्न तिकीट मिळण्याची सोय उपलब्ध व्हावी, याकरिता तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही या वेळी उपस्थित पदाधिकाºयांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडे केली.रोहा रेल्वेस्थानकाबाहेर दोन्ही बाजूस रेल्वे फाटक आहे. हे बंद करून ५० टक्के राज्य सरकारचा सहभाग व ५० टक्के केंद्राचा सहभाग या तत्त्वावर दोन्ही रेल्वेवरील उड्डाणपूल बांधण्याकरिता राज्य सरकारने प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही या वेळी करण्यात आली. रोहा रेल्वेस्थानकात सर्व रेल्वेगाड्या तांत्रिक पूर्ततेकरिता थांबतात, त्या ऐवजी सर्व गाड्यांना रोहा हा अधिकृत थांबा घोषित व्हावा, याकरिता विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना शक्यता तपासणीच्या सूचना दिल्या आहेत, तसेच पनवेल स्टेशनवर अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाव्यात, कोकण रेल्वे मार्गावर लांबपल्ल्यांच्या सर्वच रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा, हार्बर लाइन्सवर जादा गाड्या सोडाव्यात आदी मागण्यांचाही यात समावेश करण्यात आला होता.

टॅग्स :RaigadरायगडIndian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयल