शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

शिवकालीन थाटाने रंगला रायगड महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 02:22 IST

जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय... च्या जयघोषात ढोल-ताशांच्या निनादात किल्ले रायगडावर शिवशाही अवतरल्याचा थाट

महाड : जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय... च्या जयघोषात ढोल-ताशांच्या निनादात किल्ले रायगडावर शिवशाही अवतरल्याचा थाट गुरु वारी पाहायला मिळाला. राजदरबारात शिवकालीन पेहरावात सादर करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या जिवंत देखाव्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी गडावर शिवकालीन थाटात निघालेल्या मिरवणुकीमध्ये दांडपट्टा, तलवारबाजी, विविध लोककलांचे दर्शनही घडले. गडावर गुरु वारी संपन्न झालेल्या या सोहळ्याला शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. गडावरील सर्व वास्तू फुलांच्या माळांनी सजवण्यात आल्या होत्या. गडाच्या पायथ्याशी पाचाड गावात जिजामाता वाड्यालगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेल्या शिवसृष्टी शिवकालीन जीवनशैली साकारण्यात आली असून गडावरील नगारखाना, मेघडंबरी आदींसह थोर संतांचे भव्य पुतळे पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे. शिवसृष्टीमुळे येथे इ्तिहास जाग झाला आहे.शिवकाळातील शस्त्र, तलबारी, ढाल, दांडपट्टा आदि येथे पहाण्यासाठी लावली आहेत. ही शिवसृष्टी पर्यटकांना नककीच भरळ घालेल, यात शंका नाही. हुबेहुब गाव, राजवाडा येथे साकारला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच ठिकठिकाणी आरोग्यपथके तैनात होती. (प्रतिनिधी)