शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील दोन हुक्का पार्लरवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:35 IST

एपीएमसी पोलिसांची कारवाई : ग्राहकांसह हुक्का चालकांवर गुन्हे दाखल

नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी अवैधरीत्या चालणाऱ्या दोन हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. सतरा प्लाझा इमारतीमध्ये तसेच कोपरी येथील इमारतीच्या छतावर हे हुक्का पार्लर चालवले जात होते. याप्रकरणी ग्राहकांसह पार्लर चालक व मॅनेजर विरोधात एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कायद्याने बंदी असतानाही शहरात अवैधरीत्या हुक्का पार्लर चालवले जात आहेत. त्याठिकाणी उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या आकर्षणापोटी तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. परिणामी अशा हुक्का पार्लरमध्ये मुला-मुलींचे घोळके रात्री अपरात्री पाहायला मिळत आहेत. अशाच दोन बेकायदेशीर हुक्का पार्लरवर एपीएमसी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे.

कोपरी सेक्टर २६ येथील शिवम कॉम्प्लेक्स सोसायटीच्या छतावर दिवाणखाना फूड हाउसच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवले जात होते. याकरिता छतावर ताडपत्री व कपडा बांधून बंदिस्त जागा करण्यात आली होती. एपीएमसी पोलिसांनी शनिवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला असता, छताच्या दोनपैकी एका भागात हुक्का पार्लर चालवले जात असल्याचे उघड झाले. यावेळी त्याठिकाणी १० ते १२ तरुण हुक्का ओढताना आढळून आले. त्यांच्यावर कोप्टा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच हुक्का पार्लर मालक सुशांत यादव (२७) व मॅनेजर चैतन्य भोसले (२६)यांच्यावर एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे सतरा प्लाझा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर देखील हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी तिथल्या कॅफे पाम अ‍ॅटलान्टीस बारमध्ये हुक्का पार्लर चालत असल्याचे उघड झाले. त्याठिकाणी मुख्य गाळ्यासह पोटमाळ्यावर देखील ग्राहकांसाठी बैठकीची सोय करण्यात आलेली होती. कारवाईवेळी त्याठिकाणी १५ हून अधिक मुले-मुली हुक्का पिताना आढळून आले. त्यामध्ये नवी मुंबईसह तळोजा, मुंबई व ठाण्यातील मुला-मुलींचाही समावेश होता. त्या सर्वांवर कोप्टा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून हुक्का पार्लर चालक निकुंज सावला (२८) व मॅनेजर विश्वास साळवे (३५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एपीएमसी आवारात यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर चालत असल्याची बाब समोर आलेली आहे. महाविद्यालयीन तरुण- तरुणींकडून छोट्या-मोठ्या पार्टीच्या नावाखाली त्याठिकाणी हुक्का पार्ट्या रंगत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी