शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गेठे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत; उपायुक्तपदी नियुक्ती

By नारायण जाधव | Updated: August 28, 2023 15:40 IST

नगरविकास विभागाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यअधिकारी डॉ. राहुल गेठे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवर सोमवारी पुन्हा उपायुक्तपदी कायमस्वरूपी तत्काळ नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते महापालिकेत उपायुक्त म्हणून प्रतिनियुक्तीवर आले होते.दरम्यान, नवी मुंबई महापालिकेने प्रशासकीय ठराव करून २ मे २०२३ रोजी त्यांना महापालिका सेवेत कायम समावेश करण्यास मान्यता दिली होती. महापालिकेच्या विनंतीनुसार नगरविकास विभागाने सोमवारी तत्काळ प्रभावाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

राहुल गेठे हे शासनाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदावर कार्यरत असले तरी सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यअधिकारी म्हणून काम पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे ते जवळचे मित्र आहेत. यापूर्वीही गेठे यांनी नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर उपायुक्तपदाचा कारभार पाहिला आहे. मात्र, आता त्यांच्या कायम समावेशनाचे आदेश नगरविकास विभागाने सोमवारी काढले आहेत. महापालिकेत उपायुक्तांची ११ पदे मंजूर असून, यापैकी शासन कोट्यातील ५ पदांवर प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची मान्यता आहे. या प्रतिनियुक्त कोट्यातील एका पदाचे आता महापालिकेत कायमस्वरूपी समावेशन केले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका