शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

मुंबई एपीएमसीत सेस चोरीत कर्मचारी-अधिकाऱ्यांचे रॅकेट, दोन कर्मचाऱ्यांसह तिघा मापाडींवर कारवाई 

By नारायण जाधव | Updated: November 11, 2023 18:43 IST

नवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये जावक गेटवर सेस चोरीवरून फळमार्केटच्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन ...

नवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये जावक गेटवर सेस चोरीवरून फळमार्केटच्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन मापाडी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. बाजार समितीचे सदस्य सचिव पी. एल. खंडागळे यांनी हा बडगा उगारला आहे. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध मार्केटमध्ये सेसची चोरी करून दरवर्षी जो कोट्यवधींचा महसूल बुडविला जातो, त्यात बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षारक्षकांचे मोठे रॅकेट असल्याचे सिद्ध झाले आहे. या रॅकेटमागे बाजार समितीचे काही अधिकारी आणि पदाधिकारी यांचा हात असल्याची चर्चा या निमित्ताने ऐन दिवाळीत होऊ लागली आहे.

हा प्रकार उघड झाल्यानंतर बाजार समितीच्या फळ मार्केटच्या २ कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करून ३ मापाडींवरदेखील कारवाई प्रस्तावित केली आहे. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सचिवांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा प्रकारची मोठी कारवाई केली आहे.

दोन दिवसांपूर्वी फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून जावक गेटवरून बाजार समितीचा सेस भरून बाहेर गेलेल्या ग्राहकाच्या वाहनाला अडवले होते. मार्केटच्या उपसचिव संगीता अडांगळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या गाडीचा पंचनामा केला असता, गाडीत जवळपास ४ लाखांचा शेतमाल होता, मात्र ६० हजार दाखवून फक्त ६०० रुपये सेस वसूल केला होता. यावरून सचिवांनी हा कारवाईचा बडगा उगारला आहे.

दरवर्षी कोट्यवधींचे नुकसानबाजार समितीच्या पाच मार्केटपैकी कोणत्याही मार्केटच्या विविध गेटवर कुठल्याही वाहनाची नीट तपासणी केली जात नाही. कुठल्या गाडीत कोणते धान्य आहे, कोणता सुका मेवा आहे, फळांच्या किती पेट्या आहेत. सेसच्या पावतीवर किती पेट्यांची नोंद आहे. याची शहानिशा केली जात नाही. बाजार समितीच्या चौकीमध्ये खरेदीदारांकडून जो सेस वसुली केला जात आहे, त्यामध्ये बिल बुकमध्ये कार्बन कॉपी न टाकता सेसमध्ये झोल केला जात असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली होती. फळ मार्केटमध्ये असा प्रकार सर्वाधिक आहे. कारण इतर दाणा बंदर आणि साखर-मसाला मार्केटमध्ये असेसमेंट हाेते. फळ बाजारात दररोज ५०० ते ७०० वाहनांची आवक-जावक असते. प्रत्येक वाहनातून सेसची चाेरी करून अशा प्रकारे दरवर्षी बाजार समितीचा कोट्यवधींचा महसूल बुडवला जात आहे.

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणीबाजार समितीच्या विविध मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून एकाही अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र, नव्या सचिवांनी पदभार स्वीकारताच मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे कारवाई तर केली, परंतु, या सर्व गैरकारभारांची साखळी तोडून शासनाचा महसूल लुटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये आम्ही व्यापाऱ्यांनी ग्राहकास माल दिल्यावर ते पावत्या घेऊन रीतसर सेसचे पैसे वाहनचालकाकडे देतात. मात्र, अलीकडे मार्केटमधील काही दलाल आणि वाहनचालक, कर्मचारी यांनी आपसांत संगनमत करून एक रॅकेट तयार केले होते. यात वाहनात कमी किमतीचा माल असल्याचे भासवून त्यानुसार सेस भरून बाजार समितीच्या सेसची चोरी केली जात होती. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर अशा लोकांवर आधी पाळत ठेवली. नंतर बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना त्यांना पकडून या रॅकेटचा पर्दाफाश केला.- बाळासाहेब बेंडे, माजी संचालक, फळ मार्केट 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई