शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सॅनिटायझर बनविणारे रॅकेट सक्रिय, एपीएमसीमध्ये गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 04:28 IST

एपीएमसी परिसरामध्ये या प्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल करून साहित्य जप्त केले आहे. नेरूळमध्ये एका डॉक्टरने कोरोना प्रतिबंधक होमीओपॅथीक औषधी मिळतील अशा प्रकारचा फलक लावला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - कोरोनाची साथ पसरू लागल्यापासून सॅनिटायझर व मास्कची मागणी कित्येक पटीने वाढली आहे. याचाच गैरफायदा घेऊन बोगस सॅनिटायझर विक्री करणारे रॅकेटही सक्रिय होऊ लागले आहे. एपीएमसी परिसरामध्ये या प्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल करून साहित्य जप्त केले आहे. नेरूळमध्ये एका डॉक्टरने कोरोना प्रतिबंधक होमीओपॅथीक औषधी मिळतील अशा प्रकारचा फलक लावला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नवी मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. काही संशयित रुग्णांची तपासणीही करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. साथ पसरू नये यासाठी महानगरपालिकेनेही विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण शहरवासी ही साथ पसरू नये यासाठी प्रयत्न करत असताना काही जणांनी मात्र कोरोनाचा लाभ उठवून बनावट साहित्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांमध्ये सॅनिटायझरची मागणी कित्येक पटीने वाढली आहे. यामुळे काही जणांनी बनावट सॅनिटायझरचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे.ऐरोली सेक्टर ९ मधील जिशान जैदी या व्यक्तीने टीडीसी रॅक्झा व्हायरस न्युट्रलायझर नावाच्या सॅनिटायझरचे उत्पादन केले होते. यासाठी कोणत्याही कायदेशीर परवानग्या घेतल्या नव्हत्या. उत्पादन केलेल्या साहित्याची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील ग्रोमा हाऊस इमारतीमधील प्रगती ट्रेडर्सकडे विक्री केली होती. याशिवाय देव ट्रेडर्स, ग्रोहितम बिल्डिंगमधील एका दुकानामध्येही विक्री केली होती. अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक अजय माहुले यांनी संबंधिताविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.एपीएमसी परिसरामधून पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने टीडीसी रॅक्झा व्हायरस न्युट्रलायझर नावाच्या सॅनिटायझरच्या २०० मिलीच्या १७ व १० मिलीच्या ६ बॉटल असा एकूण ५३२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. संबंधित व्यक्तीने अशा प्रकारचे साहित्य अजून किती जणांना विकले आहे. यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. शहरात अजून अशा प्रकारे बनावट साहित्य विक्री करत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेरूळ पश्चिमेला एक डॉक्टरने त्याच्या दुकानाच्या बाहेर कोरोना प्रतिबंधक होमीओपॅथिक औषधी मिळतील अशा प्रकारचा फलक लावला आहे. यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ लागला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. अद्याप कोरोना प्रतिबंधक ठोस औषधे नाहीत व तशी यादीही शासनाच्या माध्यमातून घोषित केलेली नाही. असे असताना एखादा डॉक्टर प्रतिबंधक ओषधे मिळत असल्याचा दावा कसा करू शकतो, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. याप्रकरणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची, अशी मागणी होत आहे.चौकशी करण्याची मागणी१नेरूळमध्ये एका डॉक्टरने कोरोना प्रतिबंधक होमीओपॅथिक औषधी मिळतील असा फलक लावला आहे. अशा प्रकारे प्रतिबंधक औषधे उपलब्ध आहेत का? एखादा डॉक्टर अशा प्रकारे फलक लावून त्याची जाहिरात करू शकतात का, याविषयी महानगरपालिका व अन्न औषध प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.२याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता तेथील अधिकाऱ्यांनी याविषयी कारवाई करण्याची व चौकशी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची असल्याचे सांगितले. अन्न व औषध प्रशासन ठाणेचे सहआयुक्त विराज पौनीकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला संपर्क होऊ शकला नाही.पोलीस स्टेशन परिसरामध्ये बनावट सॅनिटायझर विकले जात आहे का, याविषयी तपासणी करत असताना टीडीसी रॅक्झा व्हायरस न्यूट्रलाझर नावाचे सॅनिटायझर निदर्शनास आले. त्यावर उत्पादनाविषयी आवश्यक माहिती छापलेली नव्हती. यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.- सतीश निकम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसीपोलिसांकडून शोधमोहीमकोरोना व्हायरस पसरत असल्याच्या नावाखाली बनावट उत्पादक शहरवासीयांची फसवणूक करत आहेत. अशा ठकसेनांचा पोलिसांनीही शोध सुरू केला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये बनावट सॅनिटायझर व इतर काही बनावट साहित्य विक्री होत आहे का, याचा तपास सुरू केला आहे. नागरिकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस