शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

धोक्याची घंटा : खासगी रुग्णालयांत रुग्ण सुरक्षा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 04:33 IST

शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. तर अशा रुग्णालयांना अग्निशमन विभागामार्फत नोटिसा बजावून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचा अधिका-यांचा आरोप आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. तर अशा रुग्णालयांना अग्निशमन विभागामार्फत नोटिसा बजावून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचा अधिकाºयांचा आरोप आहे. यामुळे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.शुक्रवारी पहाटे नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात आग लागल्याच्या घटनेमुळे शहरातील इतरही खासगी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. शहरातील बहुतांश रुग्णालये रहिवासी जागेत अथवा व्यावसायिक गाळ्यांमध्ये चालवली जात आहेत. यामुळे त्याठिकाणी रुग्णांच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे असतानाही त्यास बगल दिली जाते. अनेकदा रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा देखील अद्ययावत केली जात नाही. यामुळे भविष्यात अशा एखाद्या रुग्णालयात आगीची घटना घडल्यास मोठी जीवितहानी घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने पालिकेच्या अग्निशमन दलाने अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाºया काही रुग्णालयांना नोटिसा देखील बजावलेल्या आहेत. परंतु त्या रुग्णालय व्यवस्थापनांनी अग्निशमन विभागाच्या नोटिसांना केराची टोपली दाखवलेली आहे. त्याशिवाय संघटनेच्या माध्यमातून पालिका आयुक्तांची भेट घेवून संभाव्य कारवाई टाळण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या प्रकारातून रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात अनेकांनी यापूर्वी संबंधित अधिकाºयांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. त्यानंतरही रुग्णालय व्यवस्थापनांकडून रुग्णालयाच्या जागेत अग्निरोधक यंत्रणा बसवून ती अद्ययावत करून घेतलेली नाही.रुग्णांच्या सुरक्षेसाठी सुटसुटीत जागेत रुग्णालय चालवणे जाणे आवश्यक आहे. यानंतरही बहुतांश रुग्णालये रहिवासी इमारतीच्या पहिल्या अथवा दुसºया मजल्यावर अडचणीच्या जागी चालवली जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. यामुळे त्यांना परवानग्या मिळतातच कशा असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. तर जिन्याखाली, बाल्कनीच्या जागी खाटा टाकून अ‍ॅडमिट करून घेण्याची क्षमता वाढवली जात आहे. शहरातील शेकडोच्या वर रुग्णालयांंमध्ये अशाच प्रकारे मूळ जागेत फेरबदल करण्यात आलेले आहेत. ही बाब पालिकेच्या आरोग्य विभागाच्या नजरेतून सुटते कशी याबाबतही साशंकता आहे. परंतु हा निष्काळजीपणा भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो.डी. वाय. पाटील रुग्णालयात आगनवी मुंबई : नेरुळ येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास तिथल्या उपचाराच्या उपकरणाने पेट घेतला. यामुळे उपचार कक्षात आग पसरली असता, ती विझवताना अग्निशमन विभागाचे दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत.शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील उपचार कक्षात ही घटना घडली. त्याठिकाणच्या रुग्णांवर उपचार करण्याच्या उपकरणाने पहाटेच्या सुमारास पेट घेतला. काही क्षणात ही आग संपूर्ण उपचार कक्षात पसरली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही रुग्णाला दुखापत झाली नाही. या आगीची माहिती मिळताच नेरुळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सुमारे अर्धा तासात आग आटोक्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते. यावेळी तिथे वापरल्या जाणाºया रासायनिक द्रवावर पाण्याचा फवारा उडाला. त्यामुळे आगीचा भडका होवून आगीच्या ज्वालांनी अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. एन. ए. रोगडे व जी. एन. पाटील अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी रोगडे यांना उपचाराअंती घरी सोडून देण्यात आले. परंतु पाटील यांच्या चेहºयावर तसेच हाताला भाजल्याने जखम झाली आहे. यामुळे त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल