शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वास्तुविहार प्रकल्पाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, भिंतींना गेले तडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:34 IST

सर्वसामान्यांना परवडणारी घरे अशी जाहिरात करून सिडकोने खारघर सेक्टर १६ या ठिकाणी वास्तुविहार व सेलिब्रेशन हे दोन गृहप्रकल्प उभारले.

- वैभव गायकरपनवेल : सर्वसामान्यांना परवडणारी घरे अशी जाहिरात करून सिडकोने खारघर सेक्टर १६ या ठिकाणी वास्तुविहार व सेलिब्रेशन हे दोन गृहप्रकल्प उभारले. २00९ साली ग्राहकांना या घरांचा ताबादेखील देण्यात आला. मात्र, अवघी दहा वर्षे पूर्ण होण्याच्या कालावधीतच येथील घरांची पडझड सुरू झाली आहे. अधूनमधून या गृहप्रकल्पात प्लॅस्टर, स्लॅब कोसळण्याच्या घटना घडण्यात वाढ झाल्याने या गृहप्रकल्पाच्या बांधकाम दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२00९ साली या गृहप्रकल्पाचा ताबा रहिवाशांना देण्यात आला. या गृहप्रकल्पात वास्तुविहार प्रकल्पातील केएच १ मध्ये ६१४ , केएच २ मध्ये ५१२, सेलिब्रेशन केएच ३ मध्ये ४७६, सेलिब्रेशन केएच ४ मध्ये ५३२ अशी एकूण २१४४ घरे आहेत. मात्र, अवघ्या नऊ वर्षांच्या कालावधीतच या इमारतीची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, घरे खरेदी करणाऱ्यांमध्ये अल्प उत्पन्न व नोकरदारवर्गाचा सहभाग आहे. स्वत:चे घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. याकरिता प्रत्येक जण धडपड करीत असतो. मात्र, घर खरेदी केल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच घरांची दुरवस्था होत असेल तर दोष कोणाला द्यायचा? असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करीत आहेत.विशेष म्हणजे, सिडकोने उभारलेल्या खारघर शहरातील घरकुल, कळंबोली, खांदा वसाहतीमधील हजारो घरे धोकादायक असल्याचे खुद्द सिडकोने जाहीर केले आहे. या गृहप्रकल्पाचा पुनर्बांधणीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना वास्तुविहार गृहप्रकल्पातील समस्यांमुळे येथील रहिवाशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी वास्तुविहार, सेलिब्रेशन प्रकल्पात पाण्याच्या टाकीला गळती, प्लॅस्टर, स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात .नऊ वर्षांतच ही समस्या उद्भवली असेल तर भविष्याचे काय? ही चिंता येथील रहिवाशांना सतावत आहे. वास्तुविहार व सेलिब्रेशन प्रकल्पाच्या दुरवस्थेसंदर्भात स्थानिक नगरसेविका संजना कदम यांनी मागील दोन वर्षांपासून सिडको प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला आहे.२०१० पासून आम्ही या ठिकाणी वास्तव्यास आहोत. या प्रकल्पात अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. पहिल्या वर्षापासून पाणीगळतीच्या समस्येला आम्हाला सामोरे जावे लागत आहे.- दत्तात्रेय पाटील,रहिवासी, वास्तुविहारया गृहप्रकल्पातील समस्यांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली जाईल.- प्रिया रातंबे,जनसंपर्क अधिकारी, सिडको