शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात खळ्ळ खट्याक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:58 IST

सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असून, गत दहा दिवसांत दोघांचे बळी गेले आहेत. त्यानंतरही महामार्गावरील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात खळ्ळ खट्याक आंदोलन केले.सायन-पनवेल महामार्गावर मागील दहा दिवसांत दोघा मोटारसायकलस्वारांचे प्राण गेले आहेत. प्रतिवर्षी सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. यामुळे गत आठवड्यात मनसेने आंदोलन करुन खड्ड्यांमुळे घडणाऱ्या अपघातांना मंत्री, अधिकारी व ठेकेदार यांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी मनसेने केली आहे. त्यानंतरही खड्डे बुजवले जात नसल्याने सोमवारी सकाळी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नितीन खानविलकर, नितीन चव्हाण, राजू खाडे, विशाल भिलारे व श्याम ढमाले यांनी पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात खळ्ळ खट्याक आंदोलन केले. अधिकाºयांच्या दालनातील तसेच सभागृहातील टेबल, खुर्च्या, संगणक यासह खिडक्यांच्या काचांची त्यांनी तोडफोड केली. तसेच मंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.तीन दिवसांपूर्वीच मनसेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार कार्यालयात घुसलेल्या मनसैनिकांनी अधिकाºयांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यालयात एकही अधिकारी हजर नसल्याने त्यांनी तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला. मनसेने अचानकपणे केलेल्या या सर्जिकल स्ट्राइकची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोडफोड केल्यानंतर काही वेळातच शहरातील सर्व मनसैनिक भूमिगत झाले.दुपारपर्यंत पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास प्रमुख आंदोलकांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.>आंदोलकांना न्यायालयीन कोठडीपीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडल्यानंतर पाचही मनसैनिकांना संध्याकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी देखील पीडब्ल्यूडीच्या वतीने एकही अधिकारी न्यायालयात उपस्थित नव्हता. अखेर पाचही मनसैनिकांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.>महामार्गावरील खड्डे बुजवले जावे याकरिता सातत्याने पीडब्ल्यूडीकडे पत्रव्यवहार, तसेच आंदोलन देखील केलेले आहे. यानंतरही संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी यांना जाग येत नव्हती. यामुळे पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात खळ्ळ खट्याकचा आवाज करून अधिकाऱ्यांची झोप उडवण्यात आली आहे, तर येत्या काही दिवसात खड्डे न बुजवले गेल्यास व दोषींवर गुन्हा दाखल न झाल्यास पुढचे खळ्ळ खट्याक आंदोलन मंत्रालयात होईल.- गजानन काळे,शहराध्यक्ष, मनसे

टॅग्स :MNSमनसे