शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

उरण उपजिल्हा रुग्णालय, मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामासाठी निधी देण्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 22:17 IST

मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला उरण उपजिल्हा रुग्णालय आणि मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे.

मधुकर ठाकूर

उरण  : मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला उरण उपजिल्हा रुग्णालय आणि मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे.

मागील सुमारे १०-१२ वर्षांपासून उरण येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्याच्या कामाची सुरुवात झाली नाही.त्याचबरोबर मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचेही बांधकाम हे अंशदान योजतंर्गत मंजूर आहे.बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे काम वाढीव निधीअभावी बंद पडले आहे. 

या दोन्ही कामांसाठी निधी उपलब्ध करून मिळावा यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. आमदार महेश बालदी यांच्या मागणीची दखल घेऊन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी खांदा कॉलनी येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना या दोन्ही कामातील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देतानाच या इमारतींच्या बांधकामासाठी कोणतीही प्रकारे निधी कमी पडू देणार नसल्याचेही आश्वासन दिले. 

या बैठीकीसाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता रुपाली पाटील, उप विभागीय अधिकारी नरेश पवार, मिलिंद कदम, नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद वाघमारे, सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग धनाजी क्षिरसागर, मोरा पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक अभिजित मोहिते, उरण ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी. एम. काळेल, शल्य चिकित्सक डॉ. रोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरी, नितीन वरकुटे  आदी अधिकारी उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :uran-acउरणPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल