शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज तस्करीतले पंजाबचे रॅकेट ५ महिन्यांत उद्ध्वस्त; २५ जणांना अटक, ३ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:55 IST

या ड्रग्ज तस्करांकडून ३ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईसाठी पोलिसांच्या हालचाली सुरू आहेत.

नवी मुंबई : ड्रग्जविरोधी कारवाईत नवी मुंबई पोलिसांनी पाच महिन्यांत पंजाबचे रॅकेट उद्ध्वस्त करून २५ जणांना अटक केली आहे. यात सहभागी असलेल्या १० जणांचा अद्यापही पोलिस शोध घेत आहेत. या ड्रग्ज तस्करांकडून ३ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईसाठी पोलिसांच्या हालचाली सुरू आहेत.

नवी मुंबईत पंजाबमधून ड्रग्ज पुरवले जात असल्याचे पोलिसांच्या न निदर्शनात आले होते.  सीबीडीत लॉजमध्ये केलेल्या कारवाईत ड्रग्जविक्रीसाठी आलेले पंजाबचे काही जण हाती लागले होते. या कारवाईत संबंधितांचे इतरही साथीदार नवी मुंबईत ड्रग्जपुरवठा करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यावरून अद्यापपर्यंत पोलिसांनी ५ कारवायांमध्ये आंतरराज्य रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी तळोजा, कळंबोली, सीबीडी, एपीएमसी व एनआरआय पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये २५ जणांना अटक झाली असून सर्वजण पंजाबचे राहणारे आहेत. त्यांच्याकडून ३ कोटी ३१ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामध्ये अफिम, हेरॉईनचा समावेश आहे. या टोळीत सहभाग निष्पन्न झालेल्या इतर १० जणांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यावरून पंजाबमधून नवी मुंबईत ड्रग्जपुरवठा करणारी ही सर्वात मोठी टोळी असल्याचे उघड झाले आहे. यामुळे त्यांच्यावर ‘मोक्का’अंतर्गत देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. 

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर वॉचनवी मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकासह स्थानिक पोलिसांकडून ड्रग्जविरोधी कारवायांचा धडाका सुरू आहे. त्यामध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने पंजाबच्या या ड्रग्स तस्करी करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या, तर थर्टी फर्स्टच्या अनुषंगानेदेखील पार्ट्यांमध्ये ड्रग्जपुरवठा, वापर होतोय का याकडेही लक्ष ठेवले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Punjab Drug Racket Busted in Navi Mumbai; 25 Arrested

Web Summary : Navi Mumbai police dismantled a Punjab-based drug racket, arresting 25 and seizing ₹3.31 crore worth of drugs. Ten more suspects are wanted. The gang faces MCOCA charges. Police are vigilant against drug use at New Year's Eve parties.