शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

नवी मुंबईकरांच्या आदरातिथ्याने भारावले आंदोलक; राहण्यासह जेवणाची उत्तम सुविधा 

By नामदेव मोरे | Updated: January 26, 2024 15:27 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातून आलेल्या लाखो नागरिकांच्या मदतीला नवी मुंबईमधील सकल मराठा समाजाने स्वयंसेवकांची फळी तयार केली होती.

नवी मुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातून आलेल्या लाखो नागरिकांच्या मदतीला नवी मुंबईमधील सकल मराठा समाजाने स्वयंसेवकांची फळी तयार केली होती. आंदोलकांच्या राहण्याची व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली. या आदातिथ्याने आंदोलकांनी समाधान व्यक्त केले. आरक्षणाच्या लढ्यात नवी मुंबईकरांनी केलेले सहकार्य कायम लक्षात राहील अशी भुमीका अनेकांनी व्यक्त केली आहे.

मुंबईच्या वेशीवर असलेल्या नवी मुंबईमध्ये २५ जानेवारीला आंदोलक मुक्कामाला आहे. हजारो वाहने व लाखो नागरिकांची सोय कुठे करायची हा गंभीर प्रश्न होता. परंतु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने पाचही मार्केट उपलब्ध करून दिल्यामुळे पार्किंगचा व आंदोलकांच्या राहण्याचा प्रश्न क्षणात मिटला. शहरातील प्रत्येक विभागातील सकल मराठा समाजाने चार भाकरी प्रेमाची उपक्रम राबविला. घराघरातून भाकरी,चटणी, ठेचा संकलीत करण्यात आला. चार लाख पेक्षा जास्त भाकरी संकलीत झाल्या होत्या. बदलापूरवरून ५० हजार भाकरी आंदोलकांसाठी तेथील मराठा समाजाने पाठविल्या होत्या.

आंदोलकांना गुरूवारी दुपारपासून जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. रात्रीचे जेवण, सकाळी नाष्टा व पुन्हा दुपारचे जेवण देण्यात आले. पिण्याच्या बॉटेल ठिकठिकाणी वितरीत केल्या जात होत्या. याशिवाय बिस्कीटे व इतर खाद्यपदार्थ पुरविण्याची सोय केली होती. रात्रभर पामबीच रोडवर करावे, नेरूळ, सारसोळे, सानपाडा वाशी सेक्टर १७ मध्ये शेकडो नवी मुंबईकर आंदोलकांच्या स्वागतासाठी उभे राहिले होते.

अंतरवाली सराटीपासून आंदोलनात ठिकठिकाणी जेवणाची व राहण्याची सोय केली होती. पण नवी मुंबईकरांनी सर्वात उत्तम सोय केली. राहण्यासाठी व वाहने उभी करण्यासाठी सुरक्षीत जागा होती. आरक्षणाच्या लढ्यात शहरवासीयांचे योगदान विसरता येणार नाही. - दिगंबर शिंदे, परभणी नवी मुंबईमधील सकल मराठा समाजाने दाखविलेली एकजूट अभिमानास्पद आहे. येथे दोन दिवस कोणतीही गैरसोय झाली नाही. जेवणासाठीही भाकरी, भाजी, भात, सलॅड, शिरा अशी सोय केली होती. - संदीप शेडगे, आंदोलक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण