शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २३ हजार जलक्षेत्रांचे संरक्षण लालफितीत? पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:21 IST

नवी मुंबई : केंद्रीय संस्थेने प्रत्यक्ष सर्वेक्षण करूनही महाराष्ट्रातील २३ हजारांहून अधिक जलक्षेत्रांना (वेटलँड) कायदेशीर संरक्षण देण्याची प्रक्रिया रखडली ...

नवी मुंबई : केंद्रीय संस्थेने प्रत्यक्ष सर्वेक्षण करूनही महाराष्ट्रातील २३ हजारांहून अधिक जलक्षेत्रांना (वेटलँड) कायदेशीर संरक्षण देण्याची प्रक्रिया रखडली आहे. याबाबतच्या कार्यवाहीचा निर्णय प्रशासकीय लालफितीत अडकल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून  उघड झाली आहे. त्यामुळे वाढत्या विकासाच्या दबावात राज्यातील महत्त्वाची जलक्षेत्रे नष्ट होण्याचा धोका पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे. 

केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या ‘नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट’  या संस्थेने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील जलक्षेत्रांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व दस्तऐवजीकरण पूर्ण केले आहे. यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटरने उपग्रह चित्रांच्या आधारे नॅशनल वेटलँड ॲटलस तयार करून राज्यातील हजारो जलक्षेत्रांची नोंद केली होती. या सर्व वैज्ञानिक माहितीनंतरही जलक्षेत्रांना अधिकृत संरक्षण देण्याची प्रक्रिया पुढे सरकली नसल्याचे उघड झाले आहे. 

‘राजकीय इच्छाशक्तीचा अभाव’

‘वैज्ञानिक माहिती उपलब्ध असतानाही जलक्षेत्रांचे संरक्षण करण्याची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही,’ असे नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले, तर सागरशक्तीचे संचालक नंदकुमार पवार यांनी विकासाच्या दबावामुळे यावर गंभीर धोका निर्माण झाल्याचा इशारा दिला आहे.

यामुळेच उरणमध्ये पूर

जलक्षेत्रांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेले १ : ४००० प्रमाणातील वैधानिक नकाशे तयार करण्यातही विविध यंत्रणा गंभीर नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. यामुळे अनेक ठिकाणी जलक्षेत्रांवर माती टाकून बेकायदेशीर जमीन बळकावण्याचे प्रकार सुरू आहेत. उरण परिसरात निर्माण झालेली पूरस्थिती हे त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

अतिक्रमण सुरूच राहण्याची शक्यता

राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एनसीएससीएमचा अहवाल आता जिल्हा प्रशासनाकडे पुढील पडताळणीसाठी पाठवला जाणार आहे. जिल्हाधिकारी स्तरावर तपासणी करून जलक्षेत्रांची यादी सूचना व आक्षेपांसाठी प्रसिद्ध केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जलक्षेत्रांवर अतिक्रमण सुरूच राहण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's wetlands protection stuck; environmentalists fear destruction due to red tape.

Web Summary : Despite surveys, legal protection for Maharashtra's 23,000+ wetlands is delayed. Red tape hinders action, risking vital areas due to development pressure. Environmentalists cite political apathy and illegal land grabs as major concerns, warning of increased flood risks.