शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींच्या नावाखाली वेश्याव्यवसाय 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 4, 2023 20:06 IST

दलाल महिलेसह रिक्षाचालकाला अटक : धमकावून मुलींना ढकलले देहविक्रीत 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अल्पवयीन मुलींच्या नावे चालणाऱ्या देहविक्रीच्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. याप्रकरणी दलाल महिलेसह रिक्षा चालकाला अटक केली आहे. ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून त्या अल्पवयीन असल्याचे सांगून एका मुलीसाठी ८ हजार रुपये आकारले जात होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहकांमार्फत रॅकेट उघड करून २० वर्षीय दोन मुलींची सुटका केली आहे. 

नेरुळ परिसरात एक महिला दोन अल्पवयीन मुलींकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक अतुल आहेर यांनी सहायक निरीक्षक नीलम पवार यांचे पथक केले होते. या पथकाने बनावट ग्राहक तयार करून त्या महिलेला संपर्क साधला होता. त्यावेळी सदर महिलेने ग्राहकाला दोन मुलींचे फोटो पाठवून त्या अल्पवयीन असून एका मुलीचे ८ हजार रुपये सांगितले होते. त्यानुसार ग्राहकाने होणार दिला असता गुरुवारी सीबीडी येथे दोन मुलींना रिक्षातून पाठवण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी दोन मुली व रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असता, त्या दोन्ही मुलींचे वय २० वर्ष असल्याचे समोर आले. त्यांनी दलाल महिला कल्पना कोळी हि धमकावून आपल्याकडून व इतर मुलींकडून देहविक्री करून घेऊन त्यांना दोन हजार रुपये देत असल्याची कबुली दिली.

त्यानुसार रिक्षा चालक सुमित गुप्ता याच्या मदतीने पोलिसांनी कुकशेत गावातून कल्पना कोळी हिला पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९, २० वर्षाच्या मुलींना अल्पवयीन असल्याचे भासवून ती त्यांना ज्यास्त दलाली घेऊन ग्राहकांकडे पाठवत असे. यासाठी तिने इतरही मुलींना गळाला लावले आहे का याचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलिस करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई