शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर वृक्षलागवड करण्याचा प्रस्ताव स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:01 IST

राष्ट्रवादीकडून सुधारित प्रस्तावाची सूचना

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर वृक्षलागवड करण्याचा प्रस्ताव स्थगित करण्यात आला आहे. वृक्षलागवडीसाठीच्या जागेला राष्ट्रवादी काँगे्रसने विरोध केला आहे. सुधारित प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे.

महामार्गाच्या दोन्ही बाजूला तुर्भे ते उरण फाटा दरम्यान वृक्षलागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. साडेतीन किलोमीटर लांबीच्या या रोडच्या दोन्ही बाजूला सहा हजार वृक्ष लावण्याचे प्रस्तावित केले होते.एक वृक्षलागवड व संवर्धन करण्यासाठी ४६४ रुपये खर्च केले जाणार आहेत. ५७ लाख ४९ हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला होता. रवींद्र इथापे यांनी प्रस्तावित रोडवर जागेचा अभाव आहे. एमआयडीसीच्या बाजूला सर्व्हिस रोडचे काम महापालिका करणार आहे. यामुळे उरण फाटाऐवजी वाशीच्या दिशेने वृक्षलावगड करण्यात यावी. त्यासाठी सुधारणेसह प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली. महामार्ग हस्तांतर झालेला नसल्याचेही निदर्शनास आणून दिले. दिव्या गायकवाड यांनीही वाशीपर्यंत वृक्षलावगड करण्याची मागणी केली.

महापालिकेचे उपआयुक्त नितीन काळे यांनी या प्रस्तावाविषयी स्थायी समितीमध्ये माहिती दिली. रोडच्या दोन्ही बाजूला व पुलाखाली वृक्षलावगड केली जाणार आहे. वृृक्षलावगड करण्यासह पुढील तीन वर्षे संवर्धनाची जबाबदारी ठेकेदाराची असणार असल्याचेही सांगितले आहे; पण स्थायी समितीने हा प्रस्ताव स्थगित केला असल्यामुळे प्रशासन सुधारित प्रस्ताव आणणार का हे पुढील सभेत स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग