शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

मालमत्ताकर थकबाकीप्रकरण; लघू उद्योजकांच्या १५८ मालमत्ता सील, आणखी १४४ थकबाकीदारांवरही कारवाई करणार

By नामदेव मोरे | Updated: July 27, 2023 20:03 IST

उर्वरीत १४४ जणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमधील मालमत्ताकर थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. ३०२ थकबाकीदारांपैकी १५८ जणांची मालीमत्ता सील केली आहे. उर्वरीत १४४ जणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील लघुउद्योजकांनी अनेक वर्षांपासून मालमत्ताकर भरलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही उद्याेजकांना कर भरण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ४२४ जणांनी १४८ कोटी रूपये कर थकविला होता. त्यांना नोटीस दिल्यानंतर १२२ जणांनी एकूण थकबाकीपैकी मुळ मालमत्ता कराची ३६ कोटी रूपये जमा केली होती. उर्वरीत ३०२ जणांनी नोटीस देऊनही कर भरलेला नाही. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधीतांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मालमत्ताकर विभागाने १५८ उद्योजकांच्या मालमत्ता सील केल्या आहेत. कारवाईनंतर ८७ जणांनी दिड कोटीची थकबाकी भरली आहे. अजून १४४ जणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.लघु उद्योजकांना कर भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानेही दिले आहेत. या आदेशाप्रमाणे सर्वांना नोटीस देण्यात आली आहे. सर्व उद्योजकांनी थकबाकी वेळेत भरावी . अन्यथा नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल असा इशाराही मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख अतीरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिला आहे. मालमत्ता कर हा मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. या उत्पन्नामधूनच शहर विकासाची कामे करण्यात येत आहेत. एमआयडीसीमध्येही रस्ता, गटारे व इतर कामे केली जात असून उद्याेजकांनी वेळेत कर भरावा असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाTaxकर