शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

एमआयडीसीलगत १४८७ कोटींचे प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:45 IST

राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या ठाणे-बेलापूर एमआयडीसीची समस्यांच्या विळख्यातून मुक्तता होवू लागली आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या ठाणे-बेलापूर एमआयडीसीची समस्यांच्या विळख्यातून मुक्तता होवू लागली आहे. या परिसरामधील रस्ते विकासावर तब्बल १४८७ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. यामध्ये पालिकेने ७५० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. एमआयडीसी स्वत: २०० कोटी रुपये खर्च करून २१ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करत असून एमएमआरडीएने ५५० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करून उड्डाणपुलासह इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम करण्यास सुरुवात केली आहे.महाराष्ट्रातील पहिल्या औद्योगिक वसाहतीची सुरवात ठाणे जिल्ह्यापासून झाली आहे. याच जिल्ह्याचा भाग असलेल्या नवी मुंबईमधील दिघा ते नेरूळपर्यंत राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जात आहे. रिलायन्ससारख्या महत्त्वाच्या उद्योगसमूहाचे मुख्यालय या परिसरामध्ये आहे. परंतु २००८ पर्यंत औद्योगिक वसाहतीची स्थिती अत्यंत बिकट झाली होती.एमआयडीसीच्या हद्दीला लागून असलेला ठाणे- बेलापूर रोड खड्डेमय झाला होता. तुर्भे ते ठाणे अंतर पूर्ण करण्यास दोन ते तीन तास वेळ लागत होता. येथील औद्योगिक संघटनांनी राज्य शासनाकडे वारंवार समस्यांचे गाºहाणे ऐकवले होते. एमआयडीसीमधील रोडवरून वाहतूक करणे अशक्य झाले आहे. छोटी वाहने जावूच शकत नाहीत. याचा परिणाम उद्योगावर होत असून अनेकांनी उद्योगांचे स्थलांतर करण्यास सुरवात केली होती. अखेर महापालिकेने या रोडचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. २००८ पासून या रोडवरील वाहतूककोंडी जवळपास संपली. पण अंतर्गत रोडची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. अखेर महापालिकेने मुकुंद ते महापे, महापे ते फायझर रोड, तुर्भेवरून फायझर ते एलपी जंक्शन असे सर्व मुख्य रोड व त्याला जोडणारे सात रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम केले. सद्यस्थितीमध्ये एमआयडीसीचे सर्व प्रमुख रोड खड्डेविरहित झाले आहेत.महापालिकेबरोबर एमएमआरडीएने मोठा निधी या परिसरामधील प्रकल्पांवर खर्च केला आहे. ठाणे- बेलापूर रोडवरील दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्गासाठी १५५ कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय महापे ते शिळफाटा परिसरामध्ये एका उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले असून दुसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. अडवली भुतावली गावाजवळ होणाºया या पुलामुळे शिळफाटा परिसराकडे जाणाºया रोडवरील वाहतूक समस्या पूर्णपणे सुटणार आहे. याशिवाय ऐरोली कटई नाका प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग ४ यांना जोडणाºया या रोडसाठी ३८२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.एमआयडीसीनेही या परिसरातील २१ किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २०० कोटी रुपये खर्च होणार असून पुढील तीन ते चार वर्षांमध्ये पूर्ण एमआयडीसीचा मेकओव्हर होणार आहे.अडवली भुतावली गावाजवळील उड्डाणपुलाचे काम सुरूऐरोली कटई रोडचा ३८२ कोटी रूपयांचा प्रकल्प महापेसमोर ४८५ मीटर लांबीचा भुयारी मार्गएमआयडीसी मुख्यालयासमोरील उड्डाणपूलघणसोली ते तळवली१४५१ मीटर लांबीचा उड्डाणपूलसविता केमिकलसमोर५७६ मीटर लांबीचा उड्डाणपूलनवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिकचा पुनर्वापर रोड बनविण्यासाठी करण्यास सुरवात केली आहे. सद्यस्थितीमध्ये दहा ठिकाणी रोड बनविण्यासाठी प्लास्टिक लगद्याचा वापर करण्यात आला आहे. महापे येथील एनएमएमटी डेपोपासून आतील बाजूला असलेल्या रोड या तंत्राचा वापर करून तयार केला आहे. हा नवीन प्रयोगही यशस्वी झाला आहे. याशिवाय संपूर्ण एमआयडीसी खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. वितळविलेल्या प्लास्टिक लगद्याचा वापर केल्याने रस्त्याचा दर्जा चांगला होत असून हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरात इतर ठिकाणीही राबविण्यात येणार आहे.तुर्भे स्टेशनसमोर उड्डाणपूलठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्गाचे २१ मे रोजी लोकार्पण केले तेव्हा ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर नवीन उड्डाणपुलाची मागणी केली होती. याशिवाय स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनीही या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही याविषयी पाहणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली आहे.