शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बंदी झुगारून पांडवकडा धबधब्यावर धांगडधिंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:51 IST

पांडवकडा या सुप्रसिद्ध धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणांवरून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बंदी घातली आहे.

- वैभव गायकर पनवेल : पांडवकडा या सुप्रसिद्ध धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणांवरून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बंदी घातली आहे. येथील धोकादायक परिस्थितीमुळे आजवर शेकडो पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील बंदी झुगारून पर्यटक या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. शनिवारी अशाच प्रकारे प्रवेश करून धिंगाणा घालणाऱ्या आठ पर्यटकांवर खारघर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात दोन पर्यटक मुंबई येथील रहिवासी आहेत.खारघर येथील पांडवकडा धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण आहे. नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील पर्यटक येथे येतात; परंतु सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजनांअभावी या ठिकाणी दरवर्षी अपघात होतात. आतापर्यंत यात अनेक जणांचा बळी गेला आहे, त्यामुळे मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात या धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना अटकाव करण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे असले तरी उत्साही पर्यटक पर्यायी मार्गाचा अवलंब करीत धबधब्यावर प्रवेश करीत असल्याचे दिसून आले आहे. बंदी झुगारून पर्यायी मार्गाने धबधब्यावर जाणाºया पर्यटकांच्या विरोधात आता खारघर पोलिसांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी आठ पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अशाप्रकारे पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुन्हे दाखल झालेल्यात पाच जण मुंबईचे, तर उर्वरित तीन जण नवी मुंबईतील रहिवासी आहेत.खारघर पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार मागील दहा वर्षांत १० ते १५ पर्यटकांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे, त्यामुळेच पावसाळ्यात या धबधब्यावर मागील काही वर्षांपासून पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले आहेत. पांडवकडा धबधब्यावर जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून या ठिकाणावर जाणारा रस्ता धोकादायक आहे. या मार्गातूनच पांडवकडा धबधब्याचे पाणी वाहते. या पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने यात वाहून अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.>पर्यटन क्षेत्र घोषित करण्याची मागणीपांडवकडा धबधबा परिसर एक पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. तशा प्रकारचे पत्रव्यवहारही ठाकूर यांनी संबंधित खात्याला केले आहेत. या परिसराचा विकास करून सुंदर पर्यटनस्थळ निर्माण केल्यास रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. असे पत्र त्यांनी दोन वर्षांपूर्वी लिहिले होते. नगरसेविका लीना गरड यांनीही बंदी उठविण्यासाठी वनाधिकाºयांची भेट घेतली होती.>जीवितहानीटाळण्यासाठीच कारवाईया परिसरात पर्यटकांच्या जिवाचा धोका लक्षात घेऊनच वनविभागाने पर्यटकांना बंदी घातली आहे, तरीदेखील पर्यटक बंदी झुगारून या ठिकाणी धिंगाणा घालत असतात. या वर्षीही पाच जणांचा जीव धोक्यात आलेला होता. मात्र सुदैवाने ते बचावले. बंदी झुगारणाºया पर्यटकांना कायद्याचा धाक बसावा, या हेतूने शनिवारी आठ पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.- प्रदीप तिदार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक

टॅग्स :panvelपनवेल