शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

प्रक्रि या केलेले पाणी कारखान्यांना !

By admin | Updated: May 11, 2016 02:18 IST

पाण्याअभावी तळोजा एमआयडीसीतील अनेक कारखाने सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. धरणात पाणी नसल्याने आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात केली जात आहे

कळंबोली : पाण्याअभावी तळोजा एमआयडीसीतील अनेक कारखाने सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. धरणात पाणी नसल्याने आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात केली जात आहे. पाण्यावाचून येथील उद्योग डबघाईला आले असून, त्यावर तोडगा म्हणून एमआयडीसीतील कारखान्यांना प्रक्रिया केलेले पाणी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पाण्याचा अपव्यय तर टळलेच त्याचबरोबर पाणी टंचाई व कपातीवर तोडगा निघेल, असा विश्वास सिडको आणि एमआयडीसीकडून व्यक्त होत आहे.तळोजातील एकूण ९०७ हेक्टर जागेवर एमआयडीसी वसविण्यात आली आहे. या ठिकाणी आजमितीस ८२३ छोटेमोठे कारखाने आहेत. कोट्यवधींची उलाढाल होत असताना येथे पायाभूत सुविधांबरोबरच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा सूर उमटत होता. बारवी व शहाड या दोन पाणीपुरवठा केंद्रांतून तळोजा एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी ३८ एमएलडी पाणी रोज दिले जाते. पाणीपुरवठा विभागाने कारखानदारांसाठी ३० टक्के पाणीकपात सहा महिन्यांपूर्वीच सुरू केली आहे. गुरुवार व शुक्र वार हे दोन दिवस पाणीकपात करण्यात येते. जलशुद्धीकरण केंद्रातून आठवड्यातून ४८ तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शनिवारी सुध्दा कमी दाबाने पाणी होत असल्याने तीन दिवस एमआयडीसीतील कारखान्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे गुरुवार, शुक्र वार आणि शनिवारी एमआयडीसीचा घसा कोरडा पडत आहे. नेरूळ येथील सीईडीपी प्लाटमधून तळोजा एमआयडीसीला पाणी दिले तर पाणीटंचाई दूर होईल, हा उपाय मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत सुचविण्यात आला होता. याखेरीज बाजूला असलेल्या सिडको वसाहतीतून जवळपास ५५ एमएलडी पाणी प्रक्रि या होऊन बाहेर पडते. त्यापैकी आठ एमएलडी पाणी गोल्फ कोर्स आणि उद्यानाकरिता वापरण्यात येते. उर्वरित पाणी खाडीला जाऊन मिळते. हे पाणी उरण येथील महाजनको कंपनीला वीजनिर्मितीकरिता देण्याचा प्रस्तावही पूर्वी होता, मात्र त्याबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत. म्हणून नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर या वसाहतीतील मलनिस्सारण केंद्रात प्रक्रिया झालेले पाणी तळोजा एमआयडीसीतील कारखान्याला देण्याच्या दृष्टीने सिडकोने सकारात्मक भूमिका घेतली आहे. प्रशासन याबाबत सकारात्मक असून, विशेष म्हणजे याकरिता जादा पैसे मोजण्याची सुध्दा गरज भासणार नाही. (वार्ताहर)