शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सिडको कार्यक्षेत्रातील नऊ हजार हौसिंग सोसायट्यांची कटकट आता थांबणार

By नारायण जाधव | Updated: February 2, 2023 20:44 IST

कामे होणार सोपी : शासनाकडून सात सहकार अधिकारी मंजूर

नवी मुंबई :सिडकोच्या कार्यक्षेत्रातील अंदाजे साडेआठ ते नऊ हजारांहून अधिक हौसिंग सोसायट्या अर्थात सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांची विविध कामांसाठी येणाऱ्या अडचणींची कटकट आता लवकरच मिटणार आहे. नवी मुंबई शहराचा सध्याचा वाढता विकास आणि नैना क्षेत्रात येणारे विकास प्रकल्प पाहता नगरविकास विभागाने सिडकोतील सहकारी संस्था विभागासाठी वाढीव अधिकारी दिले आहेत. यामुळे गृहनिर्माण संस्थांची स्थापनेपासून ते डिम्ड कन्व्हेन्स अर्थात मानीव हस्तांतरणापर्यंतची विविध कामे करता येणे सोपे होणार आहे.

नगरविकास विभागाने १ फेब्रुवारी रोजी खास सिडकोच्या सहकारी संस्था विभागासाठी सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम दिली आहे. सध्या सिडकाेच्या कार्यक्षेत्रातील नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिकेसह उलवे, द्रोणागिरी, तळोजासह नैना क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. स्वत: सिडकोही पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ९५ हजार घरांचे बांधकाम करत आहे. यामुळे सिडकोच्या कार्यक्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. त्यादृष्टीने सिडकोच्या मागणीनुसार उच्चस्तरीय समितीने १३ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत या वाढीव सात अधिकाऱ्यांच्या पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे.

ही कामे करता येणे सोपे होणारसहनिबंधक सहकारी संस्था, सिडको कार्यालयामार्फत सध्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि नियम १९६१ नुसार काम चालते. यात गृहनिर्माण सहकारी संस्थांची नोंदणी, उपविधी तयार करणे, त्यांची दुरुस्ती, सभासद नोंदणी, थकबाकीदारांकडून वसुली करणे, दफ्तर तपासणी, सभासदांचे अपिलावर सुनावणी घेणे यासह विविध कामे चालतात. मात्र, सिडकाे कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांची संख्या लक्षात घेता सिडकोच्या सहनिबंधक कार्यालयातील विद्यमान कर्मचाऱ्यांवर ताण येत होता. परिणामी शहरातील गृहनिर्माण संस्थांची कामे उशिराने होऊन कटकटीत वाढ होत होती. परंतु, आता सात अधिकारी वाढल्याने शहरातील अंदाजे  साडेआठ ते नऊ हजार गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन पदनिर्मितीस मंजुरी१ सहनिबंधक सहकारी संस्था, १ उपनिबंधक सहकारी संस्था, १ सहायक निबंधक सहकारी संस्था, २ सहकार अधिकारी श्रेणी-१ आणि २ सहकार अधिकारी श्रेणी-२ असे सात वाढीव अधिकारी आता सिडकोच्या सहकार संस्था कार्यालयाला मिळणार आहे.

पुनर्विकासाला मिळणार चालनासध्या नवी मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, पनवेल विभागात काही ठिकाणी सिडकोने बांधलेल्या जुन्या वसाहतींचा पुनर्विकासाची कामे सुरू झालेली आहेत. ताे करताना सोसायटीतील सभासदांची संमतीपासून अनेक कामे सिडकोतील सहकारी संस्था विभागाशी निगडीत आहेत. आता वाढीव सात अधिकारी मिळाल्याने पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या गृहनिर्माण संस्था आणि विकासकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय शहरातील पुनर्विकासाला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.

खरे तर सहकार निंबधक हे शासनाच्या अधिकारात असतात. परंतु, सिडकोच्या मागणीनुसार तत्कालिन शासनाने सिडकोस सहकार विभाग सुरू करण्यास परवानगी दिली. ती दिली नसती तर सिडकोचा डोलारा कोसळला असता. सध्या सिडकोच्या नवी मुंबई आणि नवीन पनवेल कार्यक्षेत्रात साडेआठ ते नऊ हजार हौसिंग सोसायट्या आहेत. इतक्या मोठ्याप्रमाणातील सोसायट्यांचा कारभार सिडकोतील विद्यमान सहकार विभागातील अधिकार्यांना शक्य होत नाही. आता नव्याने सात अधिकारी आल्यावर त्यांच्यावरील भार हलका होण्यास मदत होईल.ए. के. भट्टाचार्य, नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लि.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको