शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

'स्मार्ट सिटी बनविण्यास दिले प्राधान्य, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठीही केला पाठपुरावा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 05:16 IST

'पुनर्बांधणीसाठी १०० टक्के सभासदांची परवानगी घेण्याची अट शिथिल करून ५१ टक्केवर आणली.'

नवी मुंबई : देशातील पहिली स्मार्ट सिटी नवी मुंबई बनविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. बेलापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआयला शासनाकडून मंजुरी मिळवून दिली. पुनर्बांधणीसाठी १०० टक्के सभासदांची परवानगी घेण्याची अट शिथिल करून ५१ टक्केवर आणली. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याची माहिती बेलापूरमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी दिली.

पायाभूत सुविधा व रोजगारवृद्धीसाठी काय केले?शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा केला. जलवाहतूक सुरू करण्यासाठीही पाठपुरावा केला. शासनस्तरावर विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. उद्योग टिकावे व रोजगारवृद्धी व्हावी, यासाठी पाठपुरावा केला. एपीएमसीमधील बंद पडलेल्या मार्केटच्या वापर बदलास परवानगी मिळवून देऊन, ते पुन्हा सुरू केले. अनेक वर्षे वापर होत नसलेली बाजारपेठ सुरू करण्यात यश मिळविले.

पुनर्बांधणीच्या प्रश्नावर भूमिका काय?मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. २०१४ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करून अडीच एफएसआयचा प्रश्न मार्गी लावला. पुनर्बांधणीसाठी इमारतीमधील १०० टक्के सभासदांची मंजुरी बंधनकारक होती. याविषयी पाठपुरावा करून ही मर्यादा ५१ टक्केवर आली आहे. शासनस्तरावर हा प्रश्न सोडविण्यात आला आहे. आता अनेक इमारतींमध्ये दोन गट असल्याने व इतर प्रश्नांमुळे पुनर्बांधणी रखडली आहे. आता नागरिकांनी एकत्र येऊन पुनर्बांधणीसाठी एकमत करणे आवश्यक आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर काय भूमिका?नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात पाठपुरावा केला. गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यासाठी सभागृहात भूमिका मांडली. गावठाणामधील घरांना प्रापर्टी कार्ड दिले. विस्तारित गावठाणामधील घरांचे सर्वेक्षणही सुरू केले होते. कुकशेतमधील प्रलंबित प्रश्न सोडविला. विस्तारित गावठाणासाठीचे प्रॉपर्टी कार्ड व इतर प्रश्नही येणाऱ्या काळात सोडविण्यात येतील.

पर्यटनवृद्धीसाठी काय भूमिका?मतदारसंघापासून जवळच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. यामुळे बेलापूरसह नवी मुंबईही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व्हावे. येथे जगभरातून पर्यटक यावेत, यासाठी पाठपुरावा केला. ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण सुरू झाले आहे. सिडकोच्या माध्यमातून मरीना प्रकल्प राबविला जाणार आहे. शहरात भगवान बुद्ध यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठीही महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे.

शहरवासीयांच्या आरोग्याचे प्रश्न?महापालिकेच्या रुग्णालयांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. बेलापूरचे पालिका रुग्णालय पूर्णक्षमतेने सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. अनेक रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली. भविष्यात शहरात पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. प्रत्येक नोडमधील आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला.

टॅग्स :belapur-acबेलापूर