शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविणार - प्रशांत ठाकूर; सिडको अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 05:26 IST

सिडकोची स्थापना झाल्यापासून ४८ वर्षांमध्ये प्रथमच स्थानिक भूमिपुत्रांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असून, विमानतळासह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई : सिडकोची स्थापना झाल्यापासून ४८ वर्षांमध्ये प्रथमच स्थानिक भूमिपुत्रांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असून, विमानतळासह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.सिडको भवनमध्ये मंगळवारी ठाकूर यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकाल्यानंतर कामकाजाविषयी भूमिका स्पष्ट केली. सिडकोचे कामकाज अधिक लोकाभिमुख करण्यावर लक्ष देणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न राहील. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून चांगले काम करण्यास प्राधान्य देणार आहे. नवी मुंबई विमानतळ, मेट्रो व अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.सिडको कार्यक्षेत्रामधील नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार मंदा म्हात्रे, सुभाष भोईर, पनवेल महापालिकेच्या महापौर कविता चौतमोल, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, महेश बालदी, महेंद्र घरत, नवी मुंबई भाजपा अध्यक्ष रामचंद्र घरत उपस्थित होते. सिडकोच्यावतीने उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल, जे. टी. पाटील यांनीही नवीन अध्यक्षांचे स्वागत केले.

टॅग्स :cidcoसिडको