शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी नागरिकांची भेट घेऊन केले जात आहे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:10 IST

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले असून, देशात पहिला क्रमांक पटकाविण्याचा निश्चय केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई :  नवी मुंबई पालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविताना  शहरात स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण, विल्हेवाट, खतनिर्मिती यावर भर देण्यात आला आहे. नेरूळ विभाग कार्यालयाकडून सोसायटी पदाधिकारी आणि सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत प्रबोधन केले जात असून, या उपक्रमाला नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले असून, देशात पहिला क्रमांक पटकाविण्याचा निश्चय केला आहे. त्याअनुषंगाने शहरात विविध कामे सुरू असून, शहरात स्वच्छतेबरोबर पर्यावरणाची जपणूक करण्याच्या अनुषंगाने कचऱ्याचे वर्गीकरण करणे. तसेच ५० किलोपेक्षा जास्त दैनंदिन कचरा निघणाऱ्या सोसायट्यांच्या आवारातच कंपोस्ट करून खतनिर्मिती करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ विभागातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, कचरा वाहतूक सुपरवायजर, कामगार आदींच्या माध्यमातून नेरूळ विभागातील सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत प्रबोधन केले जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या महापालिकेच्या या उपक्रमाला सोसायट्यांचे पदाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. काही सोसायट्यांमध्ये कंपोस्ट पिट बसविण्यासाठी जागेचा अभाव आहे अशा सोसायट्यांना आउटसोर्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता कायम राहणार असून, महापालिकेच्या डम्पिंग ग्राउण्डवरील कचऱ्याचा मोठा भार कमी होणार आहे तसेच कचरा वाहतुकीचा खर्चदेखील कमी होणार आहे.

प्लास्टीक कारवाईतून एक लाख ४० हजारांचा दंड वसूलनवी मुंबई शहरात प्लॅस्टिकचा वापर होऊ नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी महिन्यात २६ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून, एक लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच ७८ किलो प्लॅस्टिक जप्त केले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान