शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्टील मार्केटमध्ये विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 03:02 IST

आशिया खंडातील सर्वात मोठ्या कळंबोली स्टील मार्केटमध्ये इतर पायाभूत सुविधांची वानवा आहेच, त्याचबरोबर विजेचाही लपंडाव सुरू असतो.

- अरूणकुमार मेहत्रे कळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठ्या कळंबोली स्टील मार्केटमध्ये इतर पायाभूत सुविधांची वानवा आहेच, त्याचबरोबर विजेचाही लपंडाव सुरू असतो. त्यामुळे स्टील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत महावितरणकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालल्याचा आरोप व्यापाºयांनी केला आहे.कळंबोली येथील ३0२ हेक्टर जमिनीवर १२५, २५0, ४५0, ९00 चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६0 भूखंड पाडण्यात आले आहेत. या ठिकाणी सिडकोने दुर्लक्ष केल्यामुळे पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्याचबरोबर वीजपुरवठा सुद्धा नियमित केला जात नाही. स्टील मार्केटला स्वतंत्र सबस्टेशन नाही. तळोजा येथून ओव्हरहेड वाहिनीने पूर्वी वीजपुरवठा केला जात होता. याच वाहिनीवर कळंबोली आणि रोडपाली, मार्बल मार्केटचा भाग आहे. आता अंडरग्राउंड वीज वाहिनी टाकण्यात आलेली आहे, परंतु येथून होणारा विद्युत पुरवठा सुद्धा खंडित होत आहे. लोहपोलाद मार्केटमध्ये लोखंडाची कटिंग तसेच इतर कामे करण्याकरिता विजेची गरज लागते. परंतु वारंवार खंडित होणाºया विद्युत पुरवठ्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. यासंदर्भात अनेकदा तक्र ारी करूनही उपाययोजना होत नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.।स्वतंत्र उपकेंद्रआणि फिडर द्याआशिया खंडातील सर्वात मोठे स्टील मार्केट असूनही येथे स्वतंत्र वीजपुरवठा करणारी यंत्रणा नाही. तळोजा येथील सबस्टेशनवरून विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी स्टील मार्केटला नियमित वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र उपकेंद्राची उभारणी करणे गरजेचे आहे.- दीपक निकम,संचालक, स्टील चेंबर।वारंवार लाइट जात असल्याने आमच्या कामाचा खोळंबा होतो. त्यामुळे आमचा माल वेळेत बाहेर जात नाही. अनेकदा आर्थिक नुकसान होते, तसेच कामाचा उरक होत नाही. वेळेवर वीज बिल अदा करूनही आम्हाला अखंडित वीज मिळत नाही.- नितीन करवत,लोखंड व्यापारीस्टील मार्केट परिसरात तळोजा येथून वीजपुरवठा केला जातो. चौदा कि.मी. अंतराची ही वाहिनी आहे. त्यावर कळंबोली वसाहत सुद्धा आहे. तसेच फूड लँडजवळ एक वाहिनी तुटली आहे. कुठेही अडचण आली तरी येथील वीजपुरवठा खंडित होतो. याकरिता उपाययोजना सुरू आहेत.- सोमेश्वर घुमे,सहायक अभियंता, महावितरण