शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 05:36 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एका महिन्यात कार्यान्वित होणार असल्याने डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ प्राण्यांची बेकायदेशीरपणे उघड्यावर कत्तल होत आहे. यामुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून ते विमानांना धडकण्याची शक्यता आहे. ही भीती लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळ संचालकांना उलवे आणि विमानतळ परिसरातील कत्तलखाने, मांस विक्रेते यांना उघड्यावरील कत्तल बंद करण्यास सांगितले आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एका महिन्यात कार्यान्वित होणार असल्याने डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या उलवे परिसरात शेळ्या आणि कोंबड्यांच्या होणाऱ्या कत्तलीची तक्रार नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या सार्वजनिक तक्रार पोर्टलद्वारे डीजीसीएकडे केली होती. हे विमान नियमांचे उल्लंघन आहे, ज्यामध्ये कोणत्याही विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल होऊ नये, असे कुमार यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे. 

एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समिती (एईएमसी)चे प्रमुख असलेले सिडको उलवे नोडचे व्यवस्थापन करते. नॅटकनेक्टच्या तक्रारीला उत्तर देताना डीजीसीएचे संचालक अमित गुप्ता यांनी एरोड्रोम ऑपरेटरला एरोड्रोमच्या परिसरात पक्ष्यांच्या हालचालींना आकर्षित करणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसह सर्व क्रियाकलाप थांबवण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई