शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा करतेय जवानांच्या शौर्याचे राजकारण - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 11:36 IST

भारतीय जवानांच्या शौर्याचे भाजपा सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनीच भाजपाला या संदर्भात फटकारले

नवी मुंबई - भारतीय जवानांच्या शौर्याचे भाजपा सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनीच भाजपाला या संदर्भात फटकारले असून, किमान याबाबतीत तरी राजकारण करू नका, असे आर्जव या कुटुंबीयांकडून केले जात असल्याचे पवार यांनी सांगितले.ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी पवार बोलत होते. मागील निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्ने दाखविली. परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन जनतेला दिले, नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले आहेत. बेरोजगारी वाढली, अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असा आरोप पवार यांनी केला.संरक्षण कार्यालयातून राफेल कराराची कागदपत्रे चोरीला जातात. ही बाब देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर आहे. ज्यांना साधे कागदपत्रे सांभाळता येत नाहीत, ते देशाचे संरक्षण काय करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.पवारांनी सिंचन घोटाळा केला नसता, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या - सुभाष देसाईपनवेल : अजित पवार यांनी हजारो कोटीचा सिंचन घोटाळा केलानसता, तर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली नसती, अशी टीका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीयेथे केली. मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी सेना-भाजपा युतीची संयुक्त बैठक पनवेलमध्ये पार पडली. या वेळी ते बोलत होते.मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने देसाई यांनी थेट अजित पवार यांच्यावर टीका केली. पवार हे सिंचन घोटाळ्यातील पैसा निवडणुकीत वापरणार आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावर निवडणुका लढणाºया पवार कुटुंबीयांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन देसाई यांनी उपस्थितांना केले.रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, निरंजन डावखरे, देवेंद्र साटम, बाळासाहेब पाटील, शिरीष घरत, बबन पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार