शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

सरकारच्या धोरणाविरोधात माथाडींचा एल्गार, एपीएमसीतील व्यवहार दिवसभर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 04:25 IST

शासनाने माथाडी कायद्याच्या मूळ रचनेत बदल केल्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील माथाडी कामगारांनी मंगळवारी एक दिवसीय बंद पुकारला होता. जवळपास ३५ संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.

नवी मुंबई : शासनाने माथाडी कायद्याच्या मूळ रचनेत बदल केल्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील माथाडी कामगारांनी मंगळवारी एक दिवसीय बंद पुकारला होता. जवळपास ३५ संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्य सरकारकडून माथाडी कायदा संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.एपीएमसी परिसरातील व्यापार मंगळवारी पहाटेपासूनच बंद ठेवण्यात आले होते. पुढील काळात हा बंद आणखी तीव्र करण्याचा इशारा माथाडी कामगारांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळांचे विलीनीकरण करून, एकच माथाडी मंडळ करण्याचा शासनाचा निर्णय मान्य नसल्याने संपूर्ण राज्यभरात माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाºया संघटनांनी लाक्षणिक संप केला.सरकारच्या या धोरणाविरोधात आम्ही बैठका घेऊन लोकांना जागरूक करू. अधिवेशन सुरू झाल्यावर, २७ फेब्रुवारीला मशीद बंदर ते विधान भवनापर्यंत लाँग मार्च काढून सरकारची कोंडी केली जाईल, अशी प्रतिक्रिया कामगारनेते आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली, असा इशारा माथाडी संघटनेने दिला आहे. माथाडी कायदा व माथाडी मंडळाच्या योजना मोडीत काढण्याच्या शासनाच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ माथाडी संघटनांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.शासनाने माथाडी मंडळांचे एकच माथाडी मंडळ करण्याचा चालविलेला प्रयत्न तातडीने थांबवावा, तसेच त्यासंदर्भात काढलेले जीआर त्वरित रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. असे न केल्यास यापुढे विराट मोर्चा काढण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. यासंबंधी राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी बुधवार, ३१ जानेवारी रोजी सर्व संघटनांची बैठक मुंबई येथे आयोजित केली आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबई