शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

चोर्‍या रोखण्यासाठी पोलीस सरसावले

By admin | Updated: May 30, 2014 00:30 IST

सोनसाखळी आणि घरफोडीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पनवेल शहर पोलीसांनी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती वाढविण्यात आल्या आहेत

पनवेल : सोनसाखळी आणि घरफोडीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पनवेल शहर पोलीसांनी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती वाढविण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर शहरात जनजागृतीस सुरूवात केली असून चोरी ट्रेंड कसा आहे याचा अभ्यास करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्याबरोबरच सोसायट्यामध्ये बैठकी घेण्यात येत आहेत.अशा घटनांना पूर्ण आळा घालण्याचा आमचा मानस असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाजीराव भोसले यांनी सांगितले. या वर्षात पनवेल शहरातील घरफोडया , सोनसाखळी चोरी आणि बतावणी करून करण्यात येणार्‍या लुटीच्या घटना कमी झाल्या आहेतच. मात्र हे प्रमाण शून्य करण्यासाठी भोसले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संकल्प केला आहे. पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. असे प्रकार घडू नयेत याकरीता पनवेल शहर पोलीसांकडून दररोज ठाणा नाका, पंचरत्न हॉटेल, बसस्थानक, गार्डन हॉटेल आणि उरण नाका या शहरातून बाहेर पडणार्‍या नाक्यावर नाका बंदी करण्यात येत आहे. संशयीत वाहनचालकांची कागदपत्रे तपासली जात आहेत. त्याचबरोबर महत्वाच्या ठिकाणी गस्त वाढविण्यात आली असून वेगवेगळे बीट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रिक्षामधून घोषणाही सुरू करण्यात आली असून नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती देण्यात येत आहे. इमारतींच्या लिप्टमध्ये पत्र चिकटविण्यात येत आहेत. याशिवाय आम्ही पनवेल नगरपालिकेला पत्र देऊन पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याच्या सुचना केल्या असल्याचे भोसले यांनी लोकमतला सांगितले. जेणेकरू महिलांना पदपथावरून चालता येईल आणि सोनसाखळी चोरीसारखे प्रकार घडणार नाही. सोनसाखळी चोरीच्या जितक्या घटना घडल्या त्या लग्नसमारंभासारख्या कार्यक्रमावरून येताना महिलांचे दागिने खेचले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आपला कोणी पाठलाग करतोय काय याची खबरदारी महिलांना घ्यावी आणि त्वरीत नागरिकांना किंवा पोलीसांना सांगावे असे आवाहन पनवेल शहर पोलीसांनी केले आहे. (वार्ताहर)