शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे स्थलांतर होणार पडीक इमारतीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 02:17 IST

डागडुजीचे काम सुरू । घणसोलीतील बंद पडलेली सिडकोची शाळा भाडेतत्त्वावर

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलीस ठाण्याचा व्याप वाढला आहे, त्यामुळे पोलीस ठाण्याची सध्याची जागा अपुरी पडू लागली आहे. तसेच ही वास्तू पूर्णत: मोडकळीस आल्याने घणसोली येथील सिडकोच्या एका पडक्या इमारतीत पोलीस ठाण्याचा कारभार स्थलांतरित करण्यात येणार आहे. पोलीस विभागाकडून सध्या या जागेच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.

कोपरखैरणे सेक्टर ६ येथील सिडकोच्या जीर्ण झालेल्या मार्केटच्या पहिल्या मजल्यावर सध्या पोलीस ठाण्याचा कारभार चालत आहे. कामकाजाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत गैरसोयीची ठरली आहे. विशेष म्हणजे, कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र इमारतीचा प्रश्न मागील अनेक वर्षे रेंगाळला आहे. नवीन इमारत बांधून होईपर्यंत पोलीस ठाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव पोलीस विभागाकडून सिडकोला देण्यात आला होता. त्यासाठी घणसोली येथील सेक्टर ४ मध्ये वापराविना पडून असलेली शाळेची इमारत पोलीस ठाण्यासाठी उपयुक्त असल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले होते, त्यानुसार सिडकोने या इमारतीतील काही भाग भाडेतत्त्वावर पोलीस ठाण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतीचा भूखंड सिडकोने शाळेसाठी दिला होता. संबंधित संस्थाचालकाने नियम व अटींचे उल्लंघन केल्याने सिडकोने सदर भूखंड परत घेतला आहे. या प्रकरणी संस्थाचालकाने न्यायालयात दावा ठोकला असून, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही सिडकोने ही इमारत भाडेतत्त्वावर पोलीस ठाण्यासाठी देऊ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, नियमानुसार सिडकोने ही इमारत ताब्यात घेतली आहे. संबंधित शिक्षण संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी त्यावर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने या प्रकरणी कोणतेही स्थगितीचे आदेश दिलेले नाहीत. या संबंधीच्या संपूर्ण कायदेविषयक बाबी तपासूनच ही इमारत पोलीस ठाण्याला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याचे सिडकोच्या वसाहत विभागाचे व्यवस्थापक करण शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.पोलीस ठाण्याच्या उभारणीसाठी हालचालीकोपरखैरणे पोलीस ठाण्यासाठी सिडकोने सेक्टर १९ येथील पेट्रोल पंपाच्या शेजारी भूखंड आरक्षित करून ठेवला आहे. विविध कारणांमुळे पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचा प्रश्न रेंगाळला आहे. मात्र, यासंदर्भात सिडकोने सकारात्मक पावले उचलायला सुरुवात केली आहे. पुढील दीड-दोन वर्षांत पोलीस ठाण्याची नवीन इमारत बांधून तयार होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या भूखंडावर तात्पुरते शेड उभारून सध्या वाहतूक चौकी सुरू करण्यात आली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई