शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

पोलिसाने वाचविले वृध्दाचे प्राण

By admin | Updated: September 28, 2016 03:03 IST

पोलिसाच्या धाडसामुळे खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृध्दाचे प्राण वाचले आहेत. दिवाळे खाडीपुलावर मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला असून, वृध्दावर रुग्णालयात

नवी मुंबई : पोलिसाच्या धाडसामुळे खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृध्दाचे प्राण वाचले आहेत. दिवाळे खाडीपुलावर मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला असून, वृध्दावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुलावरून अज्ञाताने उडी टाकल्याचे समजताच त्याठिकाणी एनआरआय पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायाने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता खाडीत उडी मारून बुडणाऱ्या वृध्दाला बाहेर काढले.मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सीबीडी ते उलवे दरम्यानच्या खाडीपुलावर हा प्रकार घडला. सदर पुलावरुन एका वृध्दाने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या कंट्रोल रुमवर मिळाली होती. ही माहिती मिळताच एनआरआय पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अरविंद संख्ये यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, त्यांनी सदर प्रकाराचा संदेश लगतच्या परिसरात बंदोबस्तावर असलेल्या इतरही पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. त्याचवेळी सागरी सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस शिपाई जनार्दन बळावकर यांच्यापर्यंत हा संदेश पोचला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याठिकाणी जावून खाडीत उडी मारली व बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढले. दरम्यान, संख्ये यांनी घटनास्थळाकडे जातानाच रुग्णालयात कळवल्यामुळे वेळीच रुग्णवाहिका घटनास्थळी पोचली होती. त्यामधून सदर व्यक्तीला वेळीच सीबीडीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अधिक चौकशीत मोहन पाचनेकर (६२) असे त्यांचे नाव असल्याचे पोलिसांना समजले. ते दिवाळे गावचे राहणारे असून पत्नीसह त्याठिकाणी सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेले होते. परंतु पुलालगत गेल्यानंतर पत्नीला काही अंतर लांब थांबवून त्यांनी खाडीत उडी मारल्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बगाडे यांनी सांगितले. पोलीस शिपाई जनार्दन बळावकर यांचे धाडस व उपनिरीक्षक अरविंद संख्ये यांची कार्यतत्परता यामुळे पाचनेकर यांचे प्राण वाचले आहेत. परंतु त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे कारण अद्याप कळले नसल्याचेही बगाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)