शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

पोलिसांचे दंगा काबू अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:49 IST

नागरिकांनाही दक्षतेचे आवाहन । मॉकड्रिलच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय क्षेत्रामधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी ‘दंगा काबू’ अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून दोन दिवसांमध्ये तीन ठिकाणी मॉकड्रिलच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये गणेशोत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-१ चे उपआयुक्त पंकज डहाणे, परिमंडळ-२ चे उपआयुक्त अशोक दुधे व इतर अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून सीवूडमधील ग्रॅण्ड सेंट्रल मॉलमध्ये शुक्रवारी मॉकड्रिल घेण्यात आले. मॉलमध्ये अतिरेकी घुसले असल्याची माहिती वायरलेसवरून सर्व पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस व इतर सर्व यंत्रणांना देण्यात आली. रुग्णवाहिका, पोलीस, कमांडो, अग्निशमन यंत्रणा किती वेळात पोहोचली याची नोंद घेण्यात आली. बचाव कार्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु मॉकड्रिल असल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. ग्रॅण्ड सेंट्रल मॉलमधील या मॉकड्रिलची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती. पनवेलमध्येही अशाच प्रकारे प्रयोग करण्यात आला होता.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गणेशोत्सव मंडळाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या व हाउसिंग सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांच्याही बैठका घेण्यात आल्या आहेत. मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठकही घेण्यात आली आहे. सागरीकिनाºयालगत गावामधील नागरिकांच्या बैठकाही घेण्यात आल्या. शांतता कमिटी, मॉल, सिनेमा हॉल व औद्योगिक आस्थापनांचे मालक या सर्वांना काय काळजी घ्यायची याची माहिती दिली. शहरातील सुरक्षारक्षकांनाही नियमित प्रशिक्षण दिले जात आहे. सागरी कवच व संयुक्त ट्रिगल अभियान राबविण्यात येत आहे. खाडीकिनाºयाजवळील सर्व लॅण्डिंग पॉइंट, सागरी चेक पोस्ट, जेट्टी व इतर ठिकाणीही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली जात असून नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.उरणमध्येही मॉकड्रिलउरणमधील पेन्शनर पार्क परिसरामध्ये पोलिसांनी मॉकड्रिलचे आयोजन केले होते. दोन गटांमध्ये मारामारी झाली असल्याचे भासविण्यात आले होते. उरण अग्निशमन दलाचे कर्मचारी, उरण पोलीस स्टेशनचे सहा अधिकारी, २६ कर्मचारी, जेएनपीटी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज भद्रेही तत्काळ घटनास्थळी उपस्थित राहिले.पोलीस आयुक्त, सहआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही परिमंडळचे उपआयुक्त व इतर सर्व अधिकाºयांनी सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून नवी मुंबई व पनवेलमध्ये मॉकड्रिलचे आयोजन केले होते. सुरक्षा व्यवस्था व इतर यंत्रणा किती दक्ष आहे याची पाहणी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.- सुरेश मेंगडे, उपआयुक्त,विशेष शाखाउत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षणपोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-१ व परिमंडळ-२ मध्ये गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही सुरक्षेविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. मंडपामध्ये व परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था कशी असावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस