शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाच दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:26 IST

रबाळेमध्ये कोयता हस्तगत : हद्दपार केलेल्या दोघांना अटक

नवी मुंबई : तुर्भे व रबाळे परिसरामधील पाच दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून मद्यसाठा जप्त केला. रबाळेमध्ये कोयता जप्त केला आहे. शहरातून हद्दपार केलेल्या दोघांनाही अटक केली आहे.

लोकसभा निवडणुका शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरात रोज कोम्बिंग आॅपरेशन केले जात आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर छापे टाकले जात आहेत. संभाजीनगर झोपडपट्टीमध्ये बुधवारी छापा टाकून देशी दारूच्या ७३ बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी ललिता परब या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐरोली गावाजवळील झोपडपट्टीमधून देशी दारूच्या २० बाटल्या जप्त केल्या असून सदानंद शर्माविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तुर्भे पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये महात्मा गांधी नगरमध्येही बुधवारी छापा टाकून ७ देशी दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. याप्रकरणी धर्मेंद्र सरोजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच परिसरामध्ये रामराज सरोज या व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. इंदिरानगरमधील गणपतीपाडा वसाहतीमध्ये छापा टाकून देशी दारूच्या २४ बाटल्या जप्त केल्या आहेत. दारू विक्री करणाºया बाळू मोरेविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. घणसोली परिसरामध्ये तपासणी करत असताना ए. आर. मेदरू या तरुणाकडे कोयता आढळून आला आहे. मनाई आदेशाचा भंग करून स्वत:जवळ शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरोधात रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या अनेकांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार केले आहे; परंतु हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून अनेक जण नवी मुंबईमध्येच वास्तव्य करत असून त्यांच्यावरही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तुर्भे स्टोअर परिसरामधून अंबिका किशन राठोड याला बुधवारी सकाळी अटक केली आहे. याच परिसरातून बी. एस. मस्केवरा या तरुणालाही अटक केली आहे. या दोघांनाही दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते; परंतु मनाई आदेशाचे उल्लंघन करून ते या परिसरामध्ये वास्तव्य करत असल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.सर्वात मोठी कारवाईआचारसंहिता सुरू झाल्यापासून सर्वात मोठी कारवाई बुधवारी करण्यात आली. एकाच दिवशी पाच ठिकाणी दारू विक्री करणाºयांवर छापे टाकण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. शस्त्र बाळगणारा एक व हद्दपार केलेल्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैधपणे व्यवसाय करणाºयांचे धाबे दणाणले आहे.पनवेलमध्येही कारवाईपरिमंडळ एकमध्ये दारू विक्रेते व अवैध व्यवसाय करणाºयांवर छापे टाकले जात आहेत. रबाळेमध्ये अमली पदार्थ विक्री करणाºया विदेशी नागरिकांवरही कारवाई केली आहे. परिमंडळ दोनमधील पनवेल परिसरामध्येही पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. आतापर्यंत दोन किलो चरस, चार किलो गांजा व अनेक मद्यविक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचा धडाका सुरू केला आहे.