शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 20, 2025 12:23 IST

मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जात आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस दलामध्ये ७ गस्ती बोटी पुरवण्यात आल्या आहेत.

सूर्यकांत वाघमारे -नवी मुंबई : नवी मुंबईपोलिस दलातील शक्ती बोट आज, गुरुवारपासून सागरी गस्तीला वापरली जाणार आहे. गतमहिन्यात ‘लोकमत’ने पोलिसांच्या सातही बोटी नादुरुस्त अवस्थेत असल्याने सागरी सुरक्षा उघड्यावर पडल्याचे समोर आणले होते. यानंतर पोलिस आयुक्तालय स्तरावर शक्ती या बोटीची दुरुस्ती करण्यात आली असून, बुधवारी तिची चाचणी घेण्यात आली.मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जात आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस दलामध्ये ७ गस्ती बोटी पुरवण्यात आल्या आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीचा करार संपल्याने या बोटींची दुरुस्ती होऊ शकली नाही. तर नवी मुंबई पोलिसांनी कळवूनही शासन स्तरावर निर्णय न होऊ शकल्याने या बोटी धूळ खात पडून होत्या. परिणामी, उघड्यावर पडलेली सागरी सुरक्षा भाड्याच्या साध्या बोटींमधून करण्याची वेळ पोलिसांवर आली होती. यासंबंधीचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त स्तरावर शक्ती या बोटीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. पंधरा दिवसांत या बोटीमध्ये आवश्यक सर्व कामे करून तिला वापरायोग्य करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी या बोटीची चाचणी घेण्यात आली. यामध्ये ती पुन्हा वापरायोग्य असल्याचे स्पष्ट झाल्याने गुरुवारपासून ती प्रत्यक्षात सागरी गस्तीसाठी वापरली जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी सांगितले. 

बोटींच्या दुरुस्तीचा करार मार्च २०२४ मध्येच संपलानवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या सातही बोटींच्या देखभाल दुरुस्तीचा करार मार्च २०२४ मध्येच संपलेला आहे. यामुळे नादुरुस्त अवस्थेत असलेल्या सागराधीश, तरण, सुरक्षा, कर्नाळा, शक्ती व पाताळगंगा या बोटींना अद्ययावत करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. परंतु, निर्णयाचे घोंगडे अद्याप भिजत पडले असल्याने भाड्याच्या बोटीने गस्त घालावी लागत आहे. त्यामध्ये अनेक अडचणी व गस्ती पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने अखेर शक्ती बोटीची आवश्यक डागडुजी पोलिस आयुक्तालय स्तरावरच उरकून तिला वापरात आणले जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस