शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नवी मुंबईत पोलिसांनाही भेडसावत आहे पार्किंगचा प्रश्न; रस्त्यावर वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 1:38 AM

वाहनतळाची सोयच नाही; आयुक्तालयाबाहेरदेखील रस्त्यावर पार्किंग

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच पोलिसांनादेखील पार्किंगची समस्या भेडसावत आहे. काही पोलीस ठाणी वगळता इतर ठिकाणी वाहनतळ नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. यामुळेच पोलीस आयुक्तालयाबाहेरदेखील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईचा विकास करताना सिडकोला अनेक बाबींच्या नियोजनाचा विसर पडला आहे. त्यात पोलीस ठाण्यांचाही समावेश आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विभागनिहाय पोलीस ठाण्याची गरज असतानाही त्याचा विचार केला गेला नाही. यामुळे सध्या नवी मुंबईत भाडोत्री जागेत किंवा अडगळीच्या ठिकाणी पोलीस ठाण्याचा कार्यभार चालत असल्याचे पाहायला मिळते. अशातच पोलीस ठाण्यात येणाऱ्यांची व पोलिसांची वाहने लावण्यासाठीदेखील जागा नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. नवी मुंबईत सध्या दहा पोलीस ठाण्यांपैकी मागील काही वर्षात नव्याने बांधकाम झालेली चार पोलीस ठाणी वगळता इतर सहाही ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या आहे.   शहर पोलिसांसह वाहतूक पोलिसांचीदेखील हीच परिस्थिती आहे. मिळेल त्या जागेत पोलीस ठाणे चालवावे लागत असून त्याच आवारात स्वतःची खासगी तसेच शासकीय वाहने उभी करावी लागत आहेत. नवी मुंबईत सद्यस्थितीला वाहतूक व शहर पोलीस मिळून १६००च्या जवळपास अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिकांकडे दुचाकी तर काहींकडे चारचाकी वाहने आहेत. त्यांना ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारातच उभी करून ठेवावी लागत आहेत. यामुळे काही ठिकाणी पदपथ व रस्ते वाहनतळ बनल्याचेही चित्र पाहायला मिळते. अनेकदा वाहतूक पोलिसांकडून शहरातील रस्त्यावरील वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र अशा ठिकाणांवर कारवाई का नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिसांचीही वाहनतळाअभावी अडचण होत आहे. काही ठिकाणी पोलीस ठाण्याच्या जवळपासच्या मोकळ्या जागा पार्किंगसाठी तात्पुरत्या वापरल्या जात आहेत. परंतु सरसकट मोकळे भूखंड विकासकांच्या घश्यात घातले जात असल्याने पोलीस ठाण्यांसाठी हक्काची जागा मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

आयुक्तालयाबाहेरही रस्त्यावर पार्किंग-सीबीडी येथील पोलीस आयुक्तालयात अधिकारी वगळता इतरांना आतमध्ये वाहने घेऊन जाण्यास बंदी आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी किंवा कामानिमित्त आलेल्या नागरिकांना रस्त्यावरच आपली वाहने उभी करावी लागतात. काही वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी आयुक्तालयाबाहेरील रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांवरदेखील कारवाईच्या सूचना वाहतूक शाखेला दिल्या होत्या. पोलीस ठाण्याला जागाच नाही- पोलिसांकडून मागणी करूनदेखील अनेक पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. तर काही ठिकाणी जागा मिळूनदेखील अद्याप नवे पोलीस ठाणे उभारलेले नाही. वाहतूक शाखा पूर्णपणे दुर्लक्षित असल्याने पुलाखाली अथवा पदपथांवर बांधकाम करून कामकाज हाताळावे लागत आहे. यामुळे त्या ठिकाणीदेखील रस्त्यांवर वाहने उभी करावी लागत आहेत. 

वाहनतळाची सोय नाहीनवी मुंबईत १० पोलीस ठाणे  व ८ वाहतूक शाखा आहेत. त्यापैकी काही पोलीस ठाणे वगळता इतर कुठेही वाहनतळाची स्वतंत्र सोय नाही. यामुळे तिथे कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर अथवा पोलीस ठाण्याच्या आवारातच वाहने उभी करावी लागत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईParkingपार्किंग