शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांच्या वर्तणुकीवर पोलिसांची नजर; अमली पदार्थांची विक्री व सेवन विरोधात मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 02:20 IST

नवी मुंबईतील अमली पदार्थ विक्रीचे जाळे खोलवर पसरत असल्याने बेरोजगारांसह, रिक्षाचालक व महाविद्यालयीन तरुण अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागले आहेत.

नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत असून, ते रॅकेट मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यानुसार मागील नऊ महिन्यांत पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अमली पदार्थ विक्री व सेवनाच्या ९६ कारवाया करण्यात आल्या आहेत. तर शाळा-महाविद्यालयाबाहेर पोलिसांकडून तरुणांवर लक्ष ठेवले जाणार आहे.नवी मुंबईतील अमली पदार्थ विक्रीचे जाळे खोलवर पसरत असल्याने बेरोजगारांसह, रिक्षाचालक व महाविद्यालयीन तरुण अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यामुळे शहरात गांजापाठोपाठ एमडी पावडर व ब्राउन शुगरचीही मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली आहे. यामुळे उद्ध्वस्त होत चाललेल्या तरुणाईचे भवितव्य वाचवण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे; परंतु स्थानिक पातळीवर चालणारे गर्दुल्ल्यांचे अड्डे माहीत असतानाही पोलिसांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी, पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही परिमंडळमध्ये प्रत्येकी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मागील दोन महिन्यांत ३४ कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक २५ कारवाई परिमंडळ-१ मध्ये आहेत. उर्वरित नऊ कारवाई या परिमंडळ-२ मधील आहेत. त्याशिवाय गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून सात कारवाई करण्यात आलेल्या आहेत. या संपूर्ण कारवार्इंमधून १२० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तर चालू वर्षात सप्टेंबरपर्यंत संपूर्ण आयुक्तालयात ९६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी सहायक आयुक्तांच्या कार्यक्षेत्रानुसार वाशी विभागात ४७, तुर्भे विभागात २८, पनवेल विभागात २० तर पोर्ट विभागात एक कारवाई झाली आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक कारवाई झाल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अमली पदार्थविक्रेत्यांचे जाळे मोडीत निघत नसल्याचे दिसून येत आहे. अमली पदार्थांचे हे जाळे मोडीत काढण्यासाठी प्रत्येक गुन्ह्याचा खोलवर तपास केला जात असल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. प्रत्येक शाळा, महाविद्यालयाबाहेर पोलिसांकडून पाळत ठेवून विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई