शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांंच्या हाती लागले महत्त्वाचे सुगावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:08 IST

वाशी येथील व्यापा-याच्या घरावर पडलेल्या दरोडा प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे लागले आहेत.

नवी मुंबई : वाशी येथील व्यापा-याच्या घरावर पडलेल्या दरोडा प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे लागले आहेत. त्याद्वारे लवकरच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील असा पोलिसांचा विश्वास आहे, तर दरोड्यापूर्वी घराची पाहणी करून कट रचण्यात आला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.वाशी सेक्टर १७ येथे राहणाºया अरुण मेनकुदळे या व्यापाºयाच्या घरी शुक्रवारी सकाळी दरोडा पडला. यामध्ये २ कोटी ९ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. कुरिअर कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून मिठाईचे पार्सल देण्याच्या बहाण्याने एक महिला व पुरुष मेनकुदळे यांच्या घरी गेले होते. यानंतर घरातील व्यक्तींनी दरवाजा उघडताच दबा धरून बसलेल्या पाच व्यक्तींनी आत प्रवेश करून पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला. या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले असून, सर्वच दरोडेखोरांचे चेहरे दिसत आहेत. यानुसार त्यांची छायाचित्रे सर्वच पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली असता, ते सर्व जण मुंब्रा येथील असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून समजते. शिवाय दरोडा टाकल्यानंतर चोरीच्या कारमधून त्यांंनी पळ काढल्याची शक्यता वर्तवली जात असून, शहरातील सीसीटीव्हीच्या आधारे कारचा शोध घेतला जात आहे. या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ एकचे पोलीस संयुक्त तपास करत आहेत. याकरिता अनेक तपास पथके तयार करण्यात आली असून काही पथके राज्याबाहेर रवाना करण्यात आली आहेत. सीवूड येथील पॉप्युलर फायनान्सवरील दरोड्यानंतर शहरात हा मोठा गुन्हा घडला आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.मेनकुदळे यांच्या घरी दिवाळीमध्ये काही प्रमाणात कपाटाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यापैकी एखाद्या कामगाराने गुन्हेगारांना टिप दिली का ? याचा देखील तपास पोलिसांना करावा लागणार आहे. तसेच दरोडा टाकणाºया टोळीतील दोघांनी घटनेच्या एक दिवस अगोदर मेनकुदळे यांच्या घरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जावून हेरगिरी केल्याचेही तपासात समोर आले आहे.

टॅग्स :Policeपोलिस