शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

थर्टीफर्स्टच्या जल्लोषावर पोलिसांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:14 IST

नववर्षाच्या स्वागताला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाल्याने थर्टीफर्स्टच्या रात्री मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला जातो. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दोन दिवस पोलीस पहारा देणार आहेत.

नवी मुंबई : नववर्षाच्या स्वागताला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाल्याने थर्टीफर्स्टच्या रात्री मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला जातो. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दोन दिवस पोलीस पहारा देणार आहेत. या दरम्यान मोठ्या प्रमाणात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाया होणार असल्याने मद्यपान करून वाहन चालवण्यासह पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्यांना नववर्षाचे स्वागत कोठडीत करावे लागणार आहे.सरत्या वर्षाला निरोप देऊन येणाºया वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते, त्याकरिता जागोजागी खासगी अथवा व्यावसायिक पार्ट्यांचेही आयोजन केले जाते, त्यामुळे मागील काही वर्षांत थर्टीफर्स्टच्या जल्लोषाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या दरम्यान मद्यपार्ट्यांचेही आयोजन होत असल्याने त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मद्यपान करून वाहन चालवणे अथवा जुने वाद उफाळून येण्याचे प्रकार घडतात. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून थर्टीफर्स्टच्या रात्री शहरात चोख बंदोबस्त लावला जातो. त्यानुसार यंदाही शनिवार रात्रीपासूनच शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लागला असून, नववर्षाच्या पहाटेपर्यंत तो राहणार आहे. संपूर्ण आयुक्तालयात १६०० हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर नेमण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. त्याशिवाय चार उपआयुक्त, सहा सहायक आयुक्त, ४७ पोलीस निरीक्षक व १७७ सहायक निरीक्षक हेदेखील गस्तीवर असणार आहेत. शहरातील महत्त्वाचे चौक, सार्वजनिक ठिकाणे, यासह महत्त्वाच्या स्थळांवरही बंदोबस्त असणार आहे. या दरम्यान मद्यपान करून वाहन चालवताना आढळल्यास अथवा पोलिसांसोबत विनाकरण हुज्जत घातल्यास सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याची रवानगी कोठडीत केली जाणार आहे. त्यामुळे थर्टीफर्स्टचा आनंद साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास नववर्षाचे स्वागत पोलीस कोठडीतून करावे लागू शकते. त्याशिवाय मद्यसाठ्याची वाहतूक करण्यावरही बंदी घालण्यात आली असून, उत्पादन शुल्क विभागाचा परवाना असेल तरच सोबत मद्य बाळगू शकता.ध्वनिक्षेपक वापरतानाही न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत. रात्री १२ नंतर कोणत्या प्रकारच्या ध्वनिक्षेपक वाजवण्यावर बंदी असून, त्याचे उल्लंघन करताना आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.यंदा प्रथमच खासगी पार्ट्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. सोसायटी आवारात, खासगी जागेतही पार्टीमध्ये मद्याचा तसेच लाउडस्पीकरचा वापर होणार असल्यास परवानगी आवश्यक आहे. तर आतशबाजी करण्यासाठी मध्यरात्री ११.५५ पासून ते १२.३० पर्यंत या अवघ्या ३५ मिनिटांची सवलत देण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त वेळेत आतशबाजी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.याप्रसंगी उपआयुक्त तुषार दोशी, पंकज डहाणे, सुनील लोखंडे, सहायक आयुक्त अजय कदम आदी उपस्थित होते.हॉटेल, बारला पहाटेपर्यंत सवलतहॉटेल, बार व आॅर्केस्टा आदीना नववर्षाच्या पहाटे ५ वाजेपर्यंत व्यवसाय करता येणार आहे, त्याकरिता पोलिसांची सशर्त पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून, त्यासाठी प्रतितासाचे शुल्क मोजावे लागणार आहे. मात्र, या दरम्यान त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ज्याच्या नावे परवाना आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवार्इंवर भरमद्यपान करून वाहन चालवणाºयांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाया केल्या जाणार आहेत, त्याकरिता पुरेशा संख्येने ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडमध्ये तसेच रहदारीच्या मुख्य मार्गावर नाकाबंदी करून या कारवाया केल्या जाणार आहेत. शनिवारी रात्रीपासूनच या कारवाया सुरु झाल्या असून, १ जानेवारीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत त्या सुरू राहणार आहेत.खासगी पार्ट्यांवर पोलिसांची नजरथर्टीफर्स्टच्या जल्लोषासाठी व्यवसायी पार्ट्या आयोजित करताना संबंधिताला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रहिवासी सोसायट्यांमध्ये तसेच खासगी जागेत होणाºया पार्ट्यांवरही पोलिसांची नजर असणार आहे. अशा ठिकाणी विनापरवाना मद्यसाठा अथवा ध्वनिक्षेपक वापरले जात असल्यास कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.शहरवासी नववर्षाचे स्वागत आनंदात करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी घ्यायची आहे. पुढील दोन दिवस शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, प्रत्येक गैरहालचालीवर पोलिसांची नजर राहणार आहे. सार्वजनिक अथवा खासगी जागेत विनापरवाना मद्यपार्टी, डीजेपार्टी करण्यास मनाई आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालवणाºयांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई अंतर्गत गुन्हे दाखल करून पोलीस कोठडीत टाकले जाणार आहे.- संजय कुमार,पोलीस आयुक्त

टॅग्स :Policeपोलिस