शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन तोतया पोलिसांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 23:20 IST

नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर संगणक व्यावसायिकाला धमकावून लुटणा-या दोन तोतया पोलिसांना गुन्हे शाखा पथकाने अटक केली. खारघरमधील घरफोडीच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.

नवी मुंबई : नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर संगणक व्यावसायिकाला धमकावून लुटणा-या दोन तोतया पोलिसांना गुन्हे शाखा पथकाने अटक केली. खारघरमधील घरफोडीच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.शुभम सुभाष पाटील व विशाल मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी १२ आॅगस्टला रात्री साडेनऊ वाजता नेरुळ रेल्वे स्टेशनबाहेर संगणक व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखविला होता. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करून त्याच्याकडील ८६ हजार रुपये रोख रक्कम घेवून तेथून पलायन केले. याप्रकरणी नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. पोलीस असल्याचे सांगून लुटल्यामुळे आयुक्त संजय कुमार यांनी स्थानिक पोलीस स्टेशनसह गुन्हे शाखेलाही तपासाच्या सूचना दिल्या होत्या. याप्रकरणी शुभम व विशालला अटक केली असून २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.चौकशीत, ७ मार्च २०१९ रोजी खारघरमधील संगणक दुकानामधील चोरीमध्येही त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुकानामधून अडीच लाखांची चोरी झाली होती. गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, नीलेश तांबे, राणी काळे, संजय पवार, पोपट पावरा, सतीश सरफरे, ज्ञानेश्वर बनकर, प्रदीप कदम, विष्णू पवार, मिथुन भोसले, दिलीप भास्करे, युवराज जाधव, सागर हिवाळे, सतीश चव्हाण, ऊर्मिला पवार, मेघनाथ पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी