नवी मुंबई : चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे धोरण असताना पालिका प्रशासनाने पावसाळ्यातही पाणीकपात सुरू ठेवली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडणार आहेत.स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे महानगरपालिकेने पन्नास रुपयांत ३० हजार लिटर व चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. याविषयीचा ठराव २००९ मध्ये सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. गतवर्षी दुष्काळामुळे धरणात पाणीसाठा कमी झाल्याने तीन महिने २५ टक्के कपात करण्यात आली होती. परंतू पावसाळा सुरू झाल्यापासून ८० टक्के धरण भरल्यानंतरही पाणीकपात सुरूच आहे. प्रतिमाणसी १३५ लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. नेरूळ, वाशी, कोपरखैरणे इतर सर्वच ठिकाणी नागरिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. सर्वसाधारण सभेचा निर्णय डावलून प्रशासनाने परस्पर पाणीकपात केल्याने लोकप्रतिनिधीेंनी नाराज असून नगरसेवक सूरज पाटील याविषयी लक्षवेधी मांडणार आहेत.
पाणीप्रश्नावर सभागृहात लक्षवेधी
By admin | Updated: August 19, 2016 01:43 IST