शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या महापौरपदी पुन्हा कविता चौतमोल यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:19 IST

पनवेल महापालिकेच्या महापौरपदी इच्छुकांना डावलून पुन्हा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना भाजपतर्फे संधी देण्यात आली आहे.

पनवेल : पनवेल महापालिकेच्या महापौरपदी इच्छुकांना डावलून पुन्हा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना भाजपतर्फे संधी देण्यात आली आहे. मंगळवारी महापौरपदासाठी कविता चौतमोल आणि उपमहापौरपदासाठी जगदीश गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. १० जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत अधिकृतरीत्या महापौर व उपमहापौरपदाची निवड करण्यात येणार आहे.शेकापतर्फेही औपचारिकता म्हणून महापौरपदासाठी प्रिया भोईर आणि उपमहापौरपदासाठी डॉ. सुरेखा मोहोकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे संख्याबळ पाहता, भाजपतर्फे दोन्ही उमेदवार सहज निवडून येणार हे जवळपास निश्चित आहे.महापौरपदासाठी पुढील अडीच वर्षे महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकांना संधी चालून आली होती. खारघर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा व माजी महिला बाल कल्याण सभापती लीना अर्जुन गरड तसेच संजना समीर कदम यांची नावे महापौरपदासाठी आघाडीवर होती.दोन्ही नगरसेविकांनी तशी इच्छा पक्षनेतृत्वाकडे बोलून दाखवली होती. मात्र, पुन्हा एकदा चौतमोल यांना संधी दिल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लीना गरड यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकेला महापौरपदी विराजमान होण्याची संधी आरक्षणामुळे चालून आली होती. माझ्यासह या प्रवर्गातील इतर महिला सदस्यांना महापौरपदाच्या निवडीत डावलल्याची खंत व्यक्त करीत महापौर निवडीबाबत गरड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठी याची दखल घेतील, अशी आशा गरड त्यांनी व्यक्त केली.>पनवेल महापालिकेतील पक्षीय बलाबलपनवेल महापालिकेतील ७८ नगरसेवकांपैकी ५१ नगरसेवक भाजपचे आहेत. शेकापच्या वतीने महापौरपदासाठी उमेदवार अर्ज दाखल केला असला तरी पक्षीय बलाबल पाहता भाजपच्या डॉ. कविता चौतमोल महापौर तरजगदीश गायकवाड उपमहापौरपदावर निवडून येणार असल्याचे निश्चित आहे.