शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अंनिससाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही; मारेक-यांना पकडण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 03:07 IST

नरेंद्र दाभोळकर हत्येच्या सीबीआयमार्फत सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागूनही ती मिळत नसल्याची खंत हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई : नरेंद्र दाभोळकर हत्येच्या सीबीआयमार्फत सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागूनही ती मिळत नसल्याची खंत हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे. तर न्यायालयाने फटकारल्यानंतरही फरार मारेकºयांना अटक होत नाही, ही शर्मेची बाब असल्याचेही ते सीबीडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला ५४ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत अवघ्या एकाला अटक झाली असून, उर्वरित फरार असलेल्या मारेकºयांना अद्याप अटक झालेली नाही. या गुन्ह्याचा तपास सीबीआय करत असल्याने आजवर झालेल्या तपासाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी अनेकदा वेळ मागण्यात आली आहे; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याची खंत हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. यावरून सिनेअभिनेते, उद्योजक यांच्यासाठी सहज उपलब्ध होणारे पंतप्रधान अंनिसच्या कार्यकर्त्यांची भेट टाळण्यामागच्या कारणांवर संशय व्यक्त होत आहे. तर दाभोळकरांच्या हत्येच्या तपासात राजकीय इच्छाशक्ती दिसत नसल्याचीही नाराजी त्यांनी व्यक्त केली. दाभोळकरांचे मारेकरी एका ठरावीक विचारांशी बांधील होते. याच विचारांचा देशाच्या राजकीय पार्श्वभूमीशी संबंध आहे. यामुळेच दाभोळकरांचे मारेकरी अद्याप फरार असल्याने विवेकवादी विचारांच्या व्यक्तींना त्यांचा धोका असल्याची भीतीही त्यांनी सीबीडी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.तीन वर्षांत पाच तपास अधिकारी बदलले गेले असून, मागील दीड महिन्यांपासून दाभोळकरांच्या हत्येच्या गुन्ह्याला तपास अधिकारीच नाही. यामुळे तपासाकरिता शासनाने स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे, सुशीला मुंडे, मिलिंद देशमुख यांच्यासहनवी मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई