शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीतील भूखंड २.६७ लाख चौ. फूट!, सिडकोला मिळाला विक्रमी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 03:15 IST

देशभर आर्थिक मंदी सुरू आहे.

नवी मुंबई : सिडकोने शहरातील पाच भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या. ऐरोली सेक्टर ७ मधील भूखंड क्रमांक १७ साठी प्रतिचौरस फूट दोन लाख ६७ हजार ७८६ रुपये दर प्राप्त झाला आहे. सर्व पाच भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला तब्बल २२९ कोटी रुपये महसूल प्राप्त होणार आहे.देशभर आर्थिक मंदी सुरू आहे. नवी मुंबई परिसरामध्येही सर्वच उद्योगासह बांधकाम व्यवसायामध्येही समाधानकारक उलाढाल होत नसल्याचे बोलले जात होते. अशा स्थितीमध्ये सिडकोचे भूखंड विक्रमी दराने विकले जात आहे. ऐरोली व वाशीमधील पाच भूखंडांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ऐरोली सेक्टर ७ मधील भूखंड क्रमांक १७ हा निवासी व वाणिज्य वापरासाठी प्रस्तावित आहे. या भूखंडाच्या खरेदीसाठी सर्वाधिक दोन लाख ६७ हजार ७८६ रुपये दर प्राप्त झाला आहे. आधारभूत किमतीपेक्षा दुप्पट दराने भूखंडाची विक्री झाली आहे. या व्यवहारातून सिडकोला तब्बल ४१ कोटी ७७ लाख ४७ हजार रुपये मिळणार आहेत. या परिसातील सेक्टर ८ मधील भूखंड क्रमांक २६ साठी दोन लाख ५१ हजार ९१७ रुपये व वाशी सेक्टर १८ मधील भूखंड क्रमांक ३ - १ ए ला एक प्रतिचौरस फूट एकलाख ६६ हजार रुपये दर प्राप्त झाला आहे.सिडकोने विक्री केलेल्या पाचपैकी दोन भूखंड निवासी व वाणिज्य वापरासाठी आहेत. वाशीमधील दोन्ही भूखंड वाणिज्य वापरासाठी आहेत. सिडको भवनमध्ये शुक्रवारी ई-लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आली. ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रियेअंतर्गत अर्ज नोंदणी, अनामत रकमेचा भरणा, निविदा भरणे या सर्व प्रक्रिया सुलभ पारदर्शक व जलद अशा आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात आल्या. यामध्ये आॅनलाइन बंद निविदा सादर करणे निविदाकारांना अनिवार्य होते. बंद निविदा सादर करणाऱ्या निविदाकारांनाच पुढील टप्प्यातील ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार होते. पारदर्शीपणे ही प्रक्रिया पार पाडली असल्याचेही सिडको प्रशासनाने स्पष्ट केले.भूखंडनिहाय तपशील पुढीलप्रमाणेभूखंड क्षेत्रफळ प्राप्त दर एकूण रक्कमऐरोली सेक्टर ७ १,५६० २,६७,७८६ ४१ कोटी ७७ लाखऐरोली सेक्टर ८ १,७९६ २,५१,९१७ ४५ कोटी २६ लाखऐरोली सेक्टर १९ १,९६९ १,२९,६६९ २५ कोटी ५४ लाखवाशी सेक्टर १८ ३,८५० १,६६,८४६ ६४ कोटी २४ लाखवाशी सेक्टर १८ ३,८४६ १,३६,००० ५२ कोटी ३० लाख

टॅग्स :cidcoसिडको