शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
2
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
3
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
4
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
5
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
6
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
7
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
8
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
9
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
10
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
11
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
12
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
13
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
14
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
15
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
16
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
17
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
19
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
20
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...

स्वार्थासाठी तरुणांच्या भवितव्याशी खेळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:55 IST

शेअर मार्केटच्या बहाण्याने जुंपले जुगाराला; नवी मुंबईतील घटना 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: सीबीडी येथील ऑनलाइन जुगारावरील कारवाईत सूत्रधाराऐवजी कामगारच पोलिसांच्या जाळ्यात फसले आहेत. जुगाराचा सूत्रधार संभाजी पाटील याने शेअर मार्केटमध्ये नोकरीच्या बहाण्याने या तरुणांना सांगलीसह विविध भागातून आणून नवी मुंबईत वेगवेगळ्या जुगाराच्या अड्ड्यावर जुंपले होते. त्यापैकी अनेकांना कित्येक वर्षांपासून पगारदेखील देण्यात आलेला नाही.

गुन्हे शाखा पोलिसांनी सीबीडी येथील ऑनलाइन जुगाराच्या अड्ड्यावरील केलेल्या कारवाईत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामध्ये सूत्रधार संभाजी पाटील वगळता इतर त्याच्या दुकानावर काम करणारे कामगार तरुण आहेत. त्या सर्वांना संभाजी याने सांगली तसेच इतर भागातून नोकरीच्या बहाण्याने नवी मुंबईत आणले होते. स्वतःचा शेअर मार्केटचा व्यवसाय असल्याचे सांगून त्याने या तरुणांना ऑनलाइन जुगारावर जुंपले होते. 

दरम्यान, त्यांना पगारदेखील वेळेवर दिला जात नव्हता. अनेक महिने पगार थकीत ठेवल्यानंतर पाच ते दहा हजार रुपये देऊन त्यांची कोंडी करून ठेवायचा. त्याच्या या त्रासाला कंटाळून यापूर्वी काहींनी नोकरी सोडून पळदेखील काढला होता. त्यापैकी कित्येकांचे तीन ते पाच वर्षांचे वेतनदेखील संभाजी याने दिलेले नाही. मात्र सीबीडी येथील कारवाईत राजेंद्र पाटील, योगेश काळोखे व प्रमोद खोत हे तिघेही सुशिक्षित आहेत. त्यापैकी एकाचे पोलीस व्हायचे स्वप्न होते व तो पोलीस भरतीमध्येदेखील उतरणार होता. परंतु संभाजीच्या कटकारस्थानामुळे या सर्वांच्या भविष्याची राखरांगोळी झाल्याचा संताप त्यांच्या परिचितांकडून व्यक्त होत आहे.

एक तरुण बेपत्तासंभाजी यांच्याकडे नोकरी करणारा एक तरुण मागील सहा वर्षांपासून बेपत्ता असल्याचे समजते. दहा वर्षे काम करूनही त्याला पगार देण्यात आला नव्हता. त्यामुळे अचानक तो बेपत्ता होण्यामागे घातपाताचे कारण आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

साथीदाराला अटकसंभाजी पाटील याने ऑनलाइन जुगारातून कोपरखैरणेत व सांगली येथील मूळ गावी कोट्यवधींची संपत्ती केली आहे. ती ताब्यात घेऊन आजवर फसवणूक झालेल्या तरुणांची त्यातून भरपाई देण्याची मागणी होत आहे. तर खारघर व खांदेश्वर येथील जुगार सांभाळणाऱ्या संभाजीच्या इतर एका साथीदारालादेखील अटक करण्याची मागणी होत आहे.